धक्कादायक! पुणे शहराजवळ अंगावर कंटेनर घालत सहकाऱ्याचा घेतला जीव…

पुणे: एका ट्रक चालकाने जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादानंतर आपल्या सहकाऱ्याची गाडीखाली चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना वाघोली परिसरात घडली आहे. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी खूनासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

राम दत्ता पुरी (वय २५) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. परमेश्वर बालाजी देवराये असे हत्या झालेल्या सहकारी चालकाचे नाव आहे. आरोपी राम आणि परमेश्वर एकच ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करतात.गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास हे दोघंही अन्य एकासोबत जेवण करण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते. तिथे जेवण केल्यानंतर बिल देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून आरोपी रामने परमेश्वरला ट्रकखाली चिरडून मारले आहे.

जेवण झाल्यानंतर आरोपी राम आणि परमेश्वर दोघेही पुन्हा ट्रक लावलेल्या गोदामाजवळ आले होते. याठिकाणी आल्यानंतर परमेश्वर हा कंटेनरजवळ थांबला होता. यावेळी आरोपीने अचानक कंटेनर ट्रक सुरू केला आणि थेट परमेश्वरच्या अंगावर घातला. हा कंटेनर अवजड वस्तू वाहतूक करणारा असल्याने अवघ्या क्षणात परमेश्वरचा चिरडून अंत झाला. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत परमेश्वरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

वाघोली पोलिसांनी दोघांसोबत असलेला तिसरा सहकारी रामचंद्र पोळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी राम दत्ता पुरी विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीविरोधात कट रचून खून केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.

पुणे जिल्ह्यात वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी सराईत गुन्हेगारांचा गोळीबार, एकाचा मृत्यू…

पुणे पोलिस आयुक्तांनी ऋषिराज सावंत बाबत दिली महत्त्वाची माहिती…

प्रेम प्रकरण! पुणे शहरातील पोलिसकाकाच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल…

माता तू न वैरिणी! पुणे जिल्ह्यात दोन चिमुकल्यांचा झोपेतच दाबला आईने गळा…

पुणे शहरातील पोलिस अधिकाऱ्याने लोणावळ्यात घेतला गळफास…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!