
Video News: पोलिसकाका Top 10 बातम्या…
नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी…
‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाहने दारू प्यायल्याचे उघड
मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाहने दारू पिऊन महिलेला चिरडल्याचं समोर आले आहे. दोन ठिकाणी मिहिर शाह दारू प्यायल्याचे चालकाने तपासादरम्यान सांगितले.
प्रेमाला विरोध केला म्हणून जन्मदात्या बापालाच संपवलं
चंदीगड (हरियाणा): प्रेमाला विरोध केला म्हणून एका अल्पवयीन मुलीने तिच्या प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या वडिलांची हत्या केली आहे. मुस्तकीम (वय 55) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सलीम उर्फ लाला (रा. आदर्श कॉलनी, फरिदाबाद) आणि कासीम (रा.कुरेशीपूर, फरिदाबाद) यांना अटक केली आहे.
नाशिकमध्ये नगरसेवक पुत्रावर दिवसाढवळ्या हल्ल्याचा प्रयत्न
नाशिक : नाशिक शहरात नगरसेवक पुत्र अजिंक्य चुंबळे यांच्यावर दिवसाढवळ्या कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. संबंधितघटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
महिलेने 50 पेक्षा जास्त पुरुषांशी विवाह करून फसवले
चेन्नई: तमिळनाडू येथे एका महिलेनं 50 पेक्षा जास्त पुरुषांशी विवाह करून त्यांची फसवणूक करत त्यांच्या घरांतून रोख रक्कम आणि दागिने लांबवले आहेत. पोलिसांनी संबंधित आरोपी महिलेला अटक केली आहे. संध्या असे आरोपी महिलेचे नाव आहे.
पुण्यात RTO अधिकाऱ्यानेच दोघांना उडवले
पुणेः एका आरटीओ अधिकाऱ्यानेच दुचाकीला धडक देऊन दोघांना उडवले. पुणे सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला आहे. संभाजी गावडे असे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्याचे नाव असून निखिल पवार आणि विकास राठोड असे अपघातात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.
गडचिरोलीत दोन माओवाद्यांच्या आवळल्या मुसक्या
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील जंगल परिसरातून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस होते. जाळपोळ, खूनासह विविध गुन्हे त्यांच्या नावावर होते.
पूजा खेडकर यांचे दिवसेंदिवस पाय खोलात
पुणेः वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केली असल्याचं माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणली आहे. शिवाय, पूजा खेडकरांच्या आईने पुणे पोलिसांना दमदाटी केल्याचे समोर आले आहे. खासगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावल्याने त्या गाडीवर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना ही दमदाटी करण्यात आली. पोलिसांना गेटबाहेरच उभे करून बंगल्याला आतमधून कुलूप लावले.
आंध्र प्रदेशात चिमुकलीवर बलात्कार करुन केली हत्या
अमरावतीः आंध्र प्रदेशात एका 8 वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्या शाळेतील 3 अल्पवयीन मुलांनी बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींचा शोध घेण्यास श्वानाने पोलिसांना मोठी मदत केली.
पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील अपहरण करण्यात आलेल्या युवकाची हत्या
बुलढाणा: पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील अपहरण करण्यात आलेल्या युवकाचा तब्बल १८ दिवसानंतर कुजलेल्या अवस्थेत नगर जिल्ह्यात कर्जत जवळ मृतदेह आढळला आहे. दिलीप भिकाजी इंगळे असे मृतक युवकाचे नाव आहे.
जळगावमध्ये युवतीची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव: शहरात एका युवतीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दुहिता संजयकुमार मोरे (वय २५, रा. विद्युत कॉलनी, जळगाव) असे मृत युवतीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…