
नगर-कल्याण महामार्गावर अपघातात दहा ठार; संपूर्ण कुटुंबच संपलं…
पुणे: नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे हद्दीतील अंजिराची बाग येथे तिहेरी भीषण अपघात होऊन दहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओतूर वरुन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपने रिक्षा आणि ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुले यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये जुन्नर तालुक्यातील मढ येथील भाजीपाला व्यवसाय करणारे पती, पत्नी व दोन लहान मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे. डिंगोरे येथील अपघाताची ही माहिती समजतात ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. या अपघाताचा पुढील तपास ओतूर पोलिस करत आहेत. अपघातात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह ओतूर येथे शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले आहेत.
अपघातातील मृतांची संख्या आठ आहे. मृतांमध्ये एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. गणेश मस्करे (वय ३०), कोमल मस्करे (वय २५ वर्ष) हर्षद मस्करे (वय ४ वर्ष) काव्या मस्करे (वय ६ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. अन्य मृतांची नावे समजू शकली नाहीत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
ट्रक आणि कारचा भीषण अपघात 6 ठार; पाहा नावे…
हृदयद्रावक! विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा-नवरीचा अपघाती मृत्यू…
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू…
भीषण अपघात! दोन सख्ख्या भावांसह पाच मित्रांचा जागीच मृत्यू…
नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 4 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

