Live Video: अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये अपघात; दोघांचा मृत्यू…

मुंबई : अभिनेता शाहरुख खान याच्या ‘स्वदेश’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जोशी हिच्या मोटारीला इटलीमध्ये अपघात झाला आहे. अपघात झाला त्यावेळी गायत्रीसोबत तिचे पती विकास ओबेरॉयदेखील होते. गायत्री आणि विकास या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. मात्र, दुसऱ्या कारमधील स्विस कपलचा मृत्यू झाला आहे.

अभिनेत्री गायत्री तिच्या पती विकास ओबेरॉयसह इटलीला फिरायला गेली होती. त्यावेळी हा अपघात झाला आहे. इटलीमधील सार्डिनिया परिसरात हा अपघात झाला आहे. गायत्री आपल्या पतीसोबत लेम्बोर्गिनी कारमध्ये होती. तर स्विस कपलकडे फेरारी होती. मेलिसा क्रौटली (वय ६३) आणि मार्कस क्रौटली (वय ६७) अशी मृतांची नावे असून, दोघेही स्वित्झर्लंडचे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

गायत्रीने एका न्यूज वेबसाईटला सांगितले की, विकास आणि मी इटलीमध्ये आहोत. आमच्या कारचा इथे अपघात झाला. देवाच्या कृपेने आम्ही दोघेही पूर्णपणे सुखरूप आहोत. घटनेच्या वेळी गायत्री आणि तिचा पती लॅम्बोर्गिनीमध्ये प्रवास करत होते. त्यांच्या कारच्या मागे-पुढे इतरही अनेक लग्झरी गाड्या होत्या. यावेळी पुढे जात असलेल्या मिनी ट्रकला ओव्हरटेक करत असताना त्यांची कार Ferrari वर आदळली आणि ती Ferrari बाजूने जाणाऱ्या मिनी ट्रकला धडकली. या धडकेमुळे मिनी ट्रक उलटला आणि Ferrari ला आग लागली, यामध्ये त्यात प्रवास करणाऱ्या जोडप्याचा मृत्यू झाला.

अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला आहे, जो मागून येणाऱ्या वाहनाच्या डॅशबोर्डवर बसवलेल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या वाहनाला एकामागून एक किती लग्झरी वाहने ओव्हरटेक करतात हे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर थोडं पुढे जात असताना एका मिनी ट्रकला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला, त्यामुळे कार आणि ट्रक दोन्ही पलटी झाले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, गायत्री जोशी हिने 2004 मध्ये ‘स्वदेश’ या चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. पहिलाच चित्रपट तिला किंग खानसोबत करता आला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झालं. पहिला चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडला रामराम केला आणि मेमेजिंग डायरेक्टर विकास ओबेरॉयसोबत लग्नबंधनात अडकली. गायत्री जोशी हिने आपल्या करिअरची सुरुवात 1999 मध्ये मॉडेल म्हणून केली होती. 2000 मध्ये ती ‘मिस इंडिया इंटरनॅशनल’ची मानकरी ठरली होती.

Video: ऑफिसमधील दृश्य कैद पाहून घाबरण्याची शक्यता…

प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक अवस्थेत आढळला मृतदेह…

प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

प्रसिद्ध निर्मात्याला अटक, दुसऱ्या लग्नमुळे झाला होता ट्रोल…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!