गुंडगिरी! पुणे शहरात टोळक्याकडून पुन्हा वाहनांची तोडफोड…

पुणे : पुणे शहरातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून टोळक्याचा धूडगूस सुरूच आहे. शहरातील अरण्येश्वर भागात वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये दहा ते पंधरा वाहनांचं मोठे नुकसान झाले आहे.

पुणे शहरातील अरण्येश्वर भागात मध्यरात्री टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेमध्ये दहा ते पंधरा वाहनांचं मोठे नुकसान झाले आहे. एवढंच नाही तर टोळक्याकडून घरावरही दगडफेक करण्यात आली आहे. हा परिसर सहकारनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येतो.

सहकारनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतच आठ दिवसांपूर्वी देखील टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. दहशत माजवण्याच्या उद्देशाने टोळक्याकडून ही तोडफोड करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!