हृदयद्रावक! आईच्या कुशीतून उचलून नेत बाळाला ड्रममध्ये बुडवून मारलं अन्…

बीड: एका निर्दयी बापाने आपल्या चार महिन्यांच्या बाळाला पहाटेच्या सुमारास आईच्या कुशीतून उचलून नेत पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारले. यानंतर आरोपीने स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गेवराई तालुक्यात ही घटना घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अमोल हौसराव सोनवणे असे आत्महत्या करणाऱ्या बापाचे नाव आहे. तो आपली पत्नी पायल आणि चार महिन्यांच्या चिमुकल्यासह गेवराई तालुक्यातील रामनगर येथे राहत होता. अमोल याने शुक्रवारी पहाटे आपल्या मुलाला पाण्याच्या ड्रममध्ये बुडून मारले. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी अमोल सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अमोल आणि पायल दोघंही गुरुवारी रात्री जेवण करून घरात झोपले होते. पहाटे ३ वाजता आईने आपल्या ४ महिन्यांच्या बाळाला स्तनपान देऊन झोपी घातले. मात्र तासाभरात जाग आलेल्या पित्याने चिमुकल्याला आईच्या कुशीतून उचलून नेत पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारले. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. अमोल हा ट्रकचालक होता, त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे पत्नी पायल हिच्याशी त्याचा वाद होत असे. याच वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. दोघांमध्ये ४ दिवसांपूर्वीही असाच वाद झाला होता. भांडण विकोपाला गेल्यानंतर दोघांनीही एकापाठोपाठ कीटकनाशक प्राशन केले होते. चार दिवसांच्या उपचारानंतर गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी दुपारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. यानंतर शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास अमोलने हे क्रूर कृत्य केले.

अमोल याचे पायलसोबत झालेले हे दुसरे लग्न होते. दोन वर्षांपूर्वी त्याचे पहिले लग्न झाले होते, मात्र काही महिन्यांतच सततच्या वादातून त्याची पहिली पत्नी माहेरी निघून गेली. त्यानंतर दीड वर्षापूर्वी आष्टी तालुक्यातील पायल हिच्याशी त्याचे दुसरे लग्न झाले होते. पायल ही गरीब घरातील असून तिला आई नाही. ४ महिन्यांपूर्वी या दांपत्याला मुलगा झाला होता. अद्याप बाळाचे बारसे झाले नव्हते, त्यामुळे त्याचे नामकरण केले नव्हते. अमोल पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये वाद होत असल्याची माहिती आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! नवविवाहित मयुरीने वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी घेतला गळफास…

हृदयद्रावक! माझ्या जिवलग मित्रांनो, माझी जाण्याची वेळ आली आहे…

हृदयद्रावक! नवजात बाळाला रस्त्यावर फेकले; थंडीत गारठलं, कुत्र्याने लचके तोडले तरीही…

हृदयद्रावक! मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आईचाही मृत्यू…

हृदयद्रावक! आजोबांच्या मृत्यूनंतर नवविवाहित नातीचाही हृदयविकाराने मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!