वर्दीतला गणपती बाप्पा! शिव ठाकरे याने थीम ठेवली ‘पोलिस’…

मुंबईः आपला माणूस शिव ठाकरे याच्या घरी वर्दीतल्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. शिवने पोलिसांचा गणवेश परिधान करून गणपती बाप्पा घरी आणला असून, रात्रंदिवस सेवेत तत्पर असणाऱ्या पोलिसांना एकप्रकारे मानवंदना दिली आहे. शिव ठाकरेचे बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शिवचे बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आपल्या माणसाने यंदाची थीम ‘पोलिस’ अशी ठेवली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पोलिस थीम असलेल्या बाप्पाचे शिव धूमधडाक्यात स्वागत करताना दिसत आहे. या बाप्पाच्या आगमना दरम्यान 50 पोलिसही सहभागे झाले होते. जल्लोष करत त्यांनी बाप्पाचे स्वागत केले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शिव ठाकरे म्हणाला, ‘बाप्पा हा माझा एनर्जी सोर्स आहे. तसेच त्याचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी कोणतीही गोष्ट करत नाही. बाप्पावर माझा खूप विश्वास आहे. आमच्या घरी दहा दिवसांचा गणपती असतो. पण ते दहा दिवसही कमी पडतात. बाप्पाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. बाप्पा आले की दहा दिवस सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. गणेशोत्सवादरम्यान एक वेगळाच उत्साह असतो. आरत्या, मोदक, दुर्वा या सर्व गोष्टींमध्ये एक वेगळीच मजा आहे.’

आमच्या बाप्पाची मूर्ती मी निवडतो. मूर्ती निवडताना बाप्पाच्या डोळ्यांकडे माझे लक्ष असते. हवी असलेली मूर्ती शोधण्यासाठी दोन-दोन दिवस मी फिरतो, असेही शिव ठाकरे म्हणाला. दरम्यान, शिव ठाकरे याने वर्दीतला गणपती बाप्पा निवडल्यामुळे चर्चेत आला आहे.

Video: गणपती वर्गणीच्या नावाखाली किरणा दुकानदाराच्या लावली कानाखाली…

गणेशोत्सवासाठी राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांची बैठक…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!