केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघातात महाराष्ट्रातील चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू; पाहा नावे…

देहराडून (उत्तराखंड): रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर आज (रविवार) सकाळी 5.20 वाजता गौरीकुंडच्या जंगलात कोसळले. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. या अपघातात पायलटचाही मृत्यू झाला आहे.

आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण नारायण दरम्यान कोसळले. हेलिकॉप्टर कोसळण्याचे कारण खराब हवामान असल्याचे सांगितले जात आहे. गौरीकुंडवर गवत कापणाऱ्या नेपाळी वंशाच्या महिलांनी हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह 7 जण होते. दु्र्देवाने या अपघातात एकही बचावला नाही. स्थानिक प्रशासनाने मृतांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. यामध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे.

मृतांची नावे पुढीलप्रमाणे…
1. कॅप्टन राजबीर सिंग चौहान – पायलट (जयपूर)
2. विक्रम रावत बीकेटीसी रहिवासी रासी उखीमठ
3. विनोद देवी रा.उत्तर प्रदेश वय 66
4. तृष्टी सिंग उत्तर प्रदेश वय 19 वर्षे
5. राजकुमार सुरेश रा.गुजरात वय 41 वर्षे
6. श्रद्धा राजकुमार जयस्वाल रा.महाराष्ट्र
7. काशी, रा. महाराष्ट्र मुलगी वय 02 वर्षे

‘काशी’चाही मृत्यू…
यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातील जयस्वाल कुटुंबीयांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल आणि त्यांची अवघ्या दोन वर्षांची चिमुरडी काशी राजकुमार जयस्वाल यांचा समावेश आहे. जयस्वाल कुटुंब धार्मिक यात्रेसाठी उत्तराखंडला गेले होते. या दुर्घटनेत त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीचा देखील मृत्यू झाल्याची माहिती वणी शहरात समजताच हळहळ व्यक्त केली जात आहे. राजकुमार जयस्वाल यांचा मुलगा विवान हा त्या दिवशी आपल्या आजोबांसोबत पांढरकवडा येथे थांबलेला असल्यामुळे बचावला. एक वर्षांपूर्वीच त्यांच्या मुलीचं नामकरण ‘काशी’ असे करण्यात आले होते. तिच्या नावाने वणी शहरात मोठ्या भक्तिभावाने काशी शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली होती. प्रदीप मिश्रा यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून ही कथा शहरवासीयांनी अनुभवली होती.

दरम्यान, आजच्या अपघातानंतर केदारनाथ धामची हेलिकॉप्टर सेवा रद्द करण्यात आली आहे. या चारधाम यात्रेदरम्यान वेगवेगळ्या धामांवर हेलिकॉप्टर कोसळले आहेत. तसेच हेलिकॉप्टरचे अनेक वेळा आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. अलिकडेच रस्त्याच्या मधोमध एक हेलिकॉप्टर कोसळले होते.

हृदयद्रावक! विमानाच्या शेपटीत एअर होस्टेसचा मृतदेह पाहून डोळ्यात अश्रू…

विमानातून बचावलेल्या एकमेव प्रवाशाने सांगितला थरार! एअर होस्टेस जळत होत्या…

अहमदाबाद ते लंडन विमानातील कुटुंबाचा सेल्फी ठरला शेवटचा…

अहमदाबाद विमान अपघात! जळालेले मृतदेह अन् पायलटचा शेवटचा मेसेज…

अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रच्या 6 जणांचा मृत्यू; पाहा नावे…

दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न…

Video: प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची भीषण धडक; 60 ठार…

भीषण दुर्घटना! नेपाळमध्ये विमान कोसळून 19 जणांचा मृत्यू…

Video: रशियन लष्करी विमानाला आग, 15 जणांचा जागीच मृत्यू…

स्फोट! पुणे विमानतळाजवळ धडाधड फुटले 10 सिलेंडर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!