नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधांच्या तणावातून भाग्यश्रीने उचलले टोकाचे पाऊल…

नंदूरबार : शहादा शहरातील रमकूबाईनगर परिसरात एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाग्यश्री गौरव चौधरी (वय २९) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे निर्माण झालेल्या तणावातून भाग्यश्रीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.

भाग्यश्रीने १२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला. ही घटना उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली. मृत भाग्यश्रीचे वडील सुनील बन्सी चौधरी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्रीला तिचा पती गौरव चौधरी याचे अन्य महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या कारणावरून घरात वारंवार वाद होत होते आणि याच मानसिक त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली.

Police-Book

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

घटनेची माहिती मिळताच भाग्यश्रीच्या माहेरच्या नातेवाईकांनी शहादा पोलीस ठाण्यात धाव घेतली. दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी नातेवाईकांनी केली. यावेळी आई-वडील आणि नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. शवविच्छेदन झाल्यानंतर भाग्यश्रीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहादा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांचे सविस्तर जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. संशयित पतीचा मोबाईल कॉल रेकॉर्ड (CDR) आणि मेसेजची तपासणी केली जाणार आहे. प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतर आणि ठोस पुरावे हाती लागल्यास संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती अन् ससूनमध्ये…

प्रेमसंबंध! पोलिस अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी महिला शिपायाला अटक…

अनैतिक संबंध! पत्नीच्या प्रियकराला एकांतात बोलवले अन्…

महिलेचे शेजाऱ्यासोबत प्रेमसंबंध अन् दोघांना नको त्या अवस्थेत पकडलं…

अनंत गर्जे याच्या प्रेमसंबंधांविषयी माहिती होतं; घरासमोरच अंत्यसंस्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!