माजी नगरसेवक तोंडाला रुमाल बांधून घुसला महिलेच्या घरात; बेदम मारलं…

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात एक माजी नगरसेवक तोंडाला रुमाल बांधून महिलेच्या घरात घुसला होता. यानंतर नागरिकांनी भाजपच्या माजी नगरसेवकाला बेदम मारहाण केली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राहुल गोठी असे मारहाण झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. त्याच्यावर महिलेची छेड काढल्याचा आरोप आहे. घटनेच्या दिवशी राहुल गोठी हा एका महिलेच्या घरात तोंडाला रुमाल बांधून घुसला होता. घरात घुसल्यानंतर त्याने एका महिलेची छेड काढली. या आरोपाखाली राहुल गोठी याला मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा 11 च्या सुमारास ही घटना घडली आहे. या मारहाणीत राहुल गोठी जखमी झाला आहे. याप्रकरणी जखमी राहुल गोठी याच्याविरोधात नांदुरा पोलिसात तक्रारही देण्यात आली. मात्र गोठी विरोधात तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण जिल्हाभरात चर्चा होऊ लागली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे हे प्रकरण चांगलेच चव्हाट्यावर आले आहे. पोलिसांनी घडलेल्या प्रकारातील सत्य समोर आणावे, अशी मागणी होऊ लागली आहे.

पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

जळगाव! विवाहित महिलेच्या मृत्यू प्रकरणात आला नवीन ट्विस्ट…

हृदयद्रावक! मुलगी IAS झाल्याचे पेढे वाटताना वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू…

सैराटची पुरावृत्ती! वडील आणि मलगी समोरासमोर आली अन् नको ते घडलं…

हृदयद्रावक! परभणीत शिक्षकाची आत्महत्या; शेती विकून संस्थाचालकाला पैसे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!