वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्राच्या घरी घेऊन गेला अन् केला सामूहिक बलात्कार…

कोलकाता : कोलकातामधील एका उच्चभ्रू परिसरात एका युवतीवर (वय २०) तिच्याच ओळखीच्या दोन युवकांनी सामूहिक बलात्कार केला आहे. चंदन मलिक आणि दीप अशी दोघांची नावे आहेत. या घटनेनंतर आरोपी फरार असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

हरिदेवपूर येथील पीडित युवतीने आरोप केला आहे की चंदन तिला तिचा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने दीपच्या घरी घेऊन गेला तेव्हा लैंगिक अत्याचार करण्यात आला. “माझा वाढदिवस शुक्रवारी होता. त्यावेळी आरोपी चंदन आणि दीप पीडितेला फ्लॅटवर घेऊन गेले. तिथे त्यांनी जेवण केलं. जेव्हा ती घरी जाण्यासाठी निघाली तेव्हा आरोपींनी तिला थांबवले. त्यांनी कथितपणे दार बंद केलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप युवतीने केला आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!

शनिवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास पीडित युवतीने सुटका केली. घरी परतल्यानंतर तिने तिच्या कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर शनिवारी संबंधित कलमांखाली प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला. “आम्ही फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे,” असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत युवतीने म्हटले आहे की, ‘काही महिन्यांपूर्वी चंदनशी ओळख झाली होती. त्याने स्वतःची दक्षिण कोलकातामधील एका मोठ्या दुर्गा पूजा समितीचा प्रमुख म्हणून ओळख करून दिली होती. त्याच्यामार्फत पीडितेची दीपशी ओळख झाली आणि तिघेही एकमेकांच्या संपर्कात होते. दोन्ही आरोपींनी तिला पूजा समितीत सहभागी करून घेण्याचे आश्वासन दिले होते.’ पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! युवकाने होणाऱ्या पत्नीवर केला जबरदस्तीने बलात्कार अन् खून…

चिमुकल्याचा मृत्यू; नवऱ्याचा शरीर संबंधासाठी दबाव अन् सामूहिक बलात्कार…

पुणे शहरात चिमुकलीवर लॉजवर बलात्कार; आरोपीसह लॉज मालकही अटकेत…

विवाहित महिलेवर शेतात बलात्काराचा प्रयत्न; चेहऱ्यासह शरिरावर केले 15 पेक्षा जास्त वार…

महिलेला मदतीच्या बहाण्याने अंधारात घेऊन गेले अन् केला सामूहिक बलात्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!