नाशिकमध्ये युवतीची भररस्त्यात सपासप वार करत हत्या…

नाशिक : नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये एका युवतीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या इंदिरानगर येथील वनसंपदा सोसायटीतील गार्डनजवळ रात्री 10:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वैष्णवी अनिल आवारे असे मृत युवतीचे नाव आहे. वैष्णवी ही मूळची जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी असून ती नाशिकमध्ये वनसंपदा सोसायटीत पेईंग गेस्ट (PG) म्हणून राहत होती. रात्रीच्या वेळी वैष्णवी सोसायटीजवळून जात असताना, एका माथेफिरूने तिच्यावर अचानक हल्ला केला. त्याने धारदार चाकूने वैष्णवीवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली. ती निपचित पडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला. वैष्णवी रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वैष्णवीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. हा संपूर्ण प्रकार प्रेमप्रकरणातून घडला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दरम्यान, नाशिक हा कायद्याचा किल्ला आहे, असे पोलिस गुन्हेगारांकडून वदवून घेत असले तरी प्रत्यक्षात शहरातील कायदा व सुव्यवस्थेची अवस्था बिकट होत चालली आहे. नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. इंदिरानगर पोलिस पुढील तपास करत आहे.

सैराट! नाशिकमध्ये प्रेयसीचा भाऊ अन् मेव्हण्याकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या…

नाशिक! प्रसिद्ध डॉ. मनिषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट…

नाशिक जिल्ह्यातील युवतीच्या खुनाचा गुन्हा काही तासांतच उघड; प्रेमसंबंधातून हत्या…

नाशिक हादरलं! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घुण हत्या…

नाशिकमध्ये दोन सख्ख्या भावांची कोयत्याचे सपासप वार करून हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!