
मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडल्यावर गावभर रंगली प्रेमाची चर्चा…
पाटणा (बिहार): मधुबनी जिल्ह्यातील खिरहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एका सरकारी शाळेचा मुख्याध्यापक आणि शाळेमध्ये स्वयंपाक करण्यासाठी असलेल्या महिलेला एकमेकांशी अश्लील चाळे करताना मुख्याध्यापकाच्या पत्नीने रंगेहाथ पकडले. त्यानंतर मुख्याध्यापकाच्या पत्नीने संबंधित महिलेला मारहाण केली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून हे प्रकरण मिटवले आहे.
मधुबनीत असणाऱ्या एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाचे शाळेतल्या स्वयंपाकिणीशी अनैतिक संबंध होते. मुख्याध्यापकाच्या पत्नीला अनैतिक संबंधाची माहिती समजली होती. पत्नीने दोघांना रंगेहाथ पकडण्याचे ठरवले होते. तिने लक्ष ठेवून दोघांना रंगेहात पकडले. संबंधित महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. या गोंधळामुळे शाळेच्या आजूबाजूला राहणारे लोकही शाळेमध्ये गेले आणि त्यांनी मुख्याध्यापक आणि संबंधित स्वयंपाकीण महिला यांना डांबून ठेवले. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुख्याध्यापक आणि संबंधित महिलेची सुटका करून हे प्रकरण मिटवले. शिक्षण विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, मुख्याध्यापक आणि स्वयंपाकीण महिला शाळेमध्येच अश्लिल चाळे करत होते. गेल्या काही दिवसांपासून दोघं दररोज सायंकाळी चार वाजता शाळा सुटल्यानंतर शाळेमध्येच एकमेकांना भेटत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापकाचे संबंधित स्वयंपाकिणीशी गेल्या तीन वर्षांपासून अनैतिक संबंध आहेत. मुख्याध्यापकाच्या पत्नीलाही याची माहिती होती. यावरून मुख्याध्यापक आणि त्याच्या पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते.
शाळेमध्ये हे प्रकरण घडल्यामुळे त्याची जोरदार चर्चा मधुबनी जिल्ह्यात सुरू आहे. शाळेतल्या विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणारेच चुकीच्या पद्धतीनं वागत असल्याची टीकाही करण्यात येऊ लागली आहे. संबंधित मुख्याध्यापकावर कडक कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.
पत्नीला प्रियकरासोबत कारमध्ये रोमान्स करताना रंगेहात पकडलं अन्…
नवऱ्यासोबत मैत्रिणीला रंगेहात पकडल्यावर मैत्रिणीला गेटला बांधले अन्…
डॉक्टर पत्नीला दोन युवकांसोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले…
नात्याचा शेवट! अल्पवयीन दीर आणि वहिनीला रंगेहाथ पडकले…
Video: नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये रंगेहात पकडलं अन् पुढे…

