शिक्षकाने व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवत दोन मुलांसह थेट नदीत घेतली उडी…

नांदेड : एका जिल्हा परिषद शिक्षकाने व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथे घडली आहे. सुनील मोरे असे मृत शिक्षकाचे नाव असून त्यांनी आपल्या दोन मुलांसह आमदुरा येथील पुलावरुन थेट नदीपात्रात उडी घेतली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिक्षक सुनील नारायण मोरे (वय ४२), मुलगी सारा (वय १३) आणि मुलगा सुमीत (वय १०) अशी मृतांची नावे आहेत. भोकर तालुक्यातील बेंबर गावचे रहिवासी असलेले सुनील मोरे हे हिमायतनगर तालुक्यातील पोटा (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते व त्यांच्या कुटुंबीयांचे वास्तव्य शहरातील कोकाटेसांगवी (विमानतळाजवळ) होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

आज (शुक्रवार) सकाळी आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडलेल्या मोरे यांनी आपली बलेनो गाडी (एम.एच.२६.सीइ.४५८२) त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या पुणेगाव (ता.नांदेड) येथील गोदावरी नदीवरच्या पुलावर नेली. तत्पूर्वी त्यांनी ‘माझी शाळा भानेगाव’ या व्हॉटसअ‍ॅप समूहावर आपल्या कृतीची माहिती देणारा एक संदेश सोडला होता. त्यातच मी माझ्या मुलांसकट आत्महत्या करत आहे, असे नमूद केले होते. त्यानंतर सकाळी पावणेआठच्या सुमारास त्यांनी आपली चालती गाडी थेट गोदावरी नदीपात्राच्या स्वाधीन केल्यामुळे या थरारक दुर्घटनेमध्ये त्यांच्यासह मुलगी व मुलगा यांनाही जलसमाधी मिळाली. सुनील मोरे आणि त्याच्या 2 मुलांचे मृतदेहही कारमधून बाहेर काढण्यात आल्याचे माहिती एसडीआरएफ पथकाचे एपीआय सुरेश सपकाळ यांनी दिली.

सुमित मोरे हे हिमायतनगर तालुक्यातील कोटा जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक होते, वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून आपण दोन मुलांसह आत्महत्या करत असल्याचे स्टेटस त्यांनी व्हाट्सअप वर ठेवले होते. त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील अतिशय संवेदनशील संदेशामध्ये जि.प.शिक्षण विभागाच्या काही आजी-माजी अधिकार्‍यांच्या नावांचा उल्लेख दिसून आला. त्यांच्यामुळे मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे, असे म्हटले होते.

शिक्षक सुनील मोरे यांनी सोडलेला शेवटचा संदेश, त्यांच्या लॅपटॉपमध्ये साठवून ठेवलेली आवश्यक ती माहिती तसेच त्यांच्या आत्महत्येनंतर हदगाव तालुक्यातील एका कार्यकर्त्याने माध्यमांसमोर दिलेली प्रतिक्रिया इत्यादी अनेक बाबी पुढील व्यापक चौकशीचा विषय ठरल्या आहेत. ज्या गटशिक्षण अधिकार्‍याचे मोरे यांनी नाव घेतले ते आता अमरावती येथे उपशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत आहेत. शिक्षकाच्या आत्महत्येने नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

नवोदय विद्यालयाच्या शिक्षकाने केली आत्महत्या; चिठ्ठीत लिहिले…

हृदयद्रावक! परभणीत शिक्षकाची आत्महत्या; शेती विकून संस्थाचालकाला पैसे…

महाराष्ट्र हादरला! शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या…

शिक्षकाने ब्लॅकमेल करत असल्याचे स्टेटस ठेवून केली आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!