
पुणे! विद्यार्थिनीचा पाचव्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू; सॉरी, मम्मी पप्पा…
पुणे: धनकवडी परिसरातील एका सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. रिद्धी रवी केडिया (वय १७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती इयत्ता बारावीच्या वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, धनकवडी येथील निर्मल पार्क सोसायटीमधील पाचव्या मजल्यावरून पडून रिद्धीचा मृत्यू झाला. ही घटना तोल जाऊन घडली की तिने आत्महत्या केली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (ता. 15) नेहमीप्रमाणे कुटुंबातील सर्वजण रात्रीचे जेवण करून झोपले होते. गुरुवारी पहाटे रिद्धीच्या आजीला जाग आली असता ती घरात दिसली नाही. रिद्धीच्या आजीने ही माहिती घरातील इतर सदस्यांना दिली. रिद्धीची शोधाशोध सुरू झाली.
View this post on Instagram
घराचा मुख्य दरवाजा आतून बंद आढळला. गॅलरीत एक स्टूल आढळल्याने कुटुंबीयांनी इमारतीखाली धाव घेतली असता रिद्धीही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून रिद्धीचा मोबाईल, पुस्तके आणि इतर काही महत्त्वाच्या वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.
दरम्यान, तपासादरम्यान तिच्या वहीमध्ये ‘सॉरी, मम्मी पप्पा’ असा एका ओळीचा संदेश लिहिलेला आढळल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या संदेशाचा नेमका अर्थ काय आणि त्याचा या घटनेशी काही संबंध आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. रिद्धीचा मृत्यू तोल जाऊन पडल्याने झाला की अन्य काही कारण आहे, याचा तपास सहकारनगर पोलिस करत आहेत.
पुणे! पती-पत्नीचा संशयावरून वाद अन् तीन मांजरींचा होरपळून मृत्यू…
पुणे! घायवळ टोळीकडून कोयत्याने वार, हल्ल्याचा सूत्रधाराला मुंबईतून केली अटक…
पुणे! PSIचा कॅफेमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निलंबन; अन् आता…
पुणे! प्रेमविवाह केल्यानंतर नवऱ्याचे अनैतिक संबंध पत्नीला समजले अन्…

