भाजपच्या महिला नेत्याच्या मृत्यूनंतर उडाली खळबळ…
अहमदाबाद (गुजरात) : सूरतमध्ये भाजपच्या महिला नेत्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली आहे. दीपिका पटेल (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या महिला नेत्याचे नाव आहे.
गुजरातच्या सूरत शहरातील अलथाना वार्ड क्रमांक ३० मधील भाजपच महिला मोर्चाच्या अध्यक्षा दीपिका पटेल यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी राहत्या घरी जीवन संपवले. परंतु, दीपिका यांच्या नातेवाईकांनी तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
दीपिका यांच्या नातेवाईकाने म्हटले की, ‘दीपिका गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची कार्यकर्ता होती. ती समाजसेवा करायची. यादरम्यान, तिच्या कुटुंबाला तिची हत्या होण्याची भीती होती. आत्महत्या करताना त्यांचे कुटुंबीय आणि मुले घरात होते. तर त्यांचे पती शेतात होते.
दरम्यान, दीपिका पटेल यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, याबाबतची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टनंतर समोर येण्याची शक्यता आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
EVM हॅकिंगचा दावा करणाऱ्याविरोधात सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल…
प्रसिद्ध अभिनेत्रीची घरात गळफास घेऊन आत्महत्या…
Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…
भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा छापा; मोठं घबाड हाती…
मुलाच्या मृत्यूनंतर तब्बल 11 दिवस ठेवले व्हेंटिलेटरवर; सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल…