
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाचा मोठा दिलासा…
नाशिक : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली असून, न्यायमूर्ती नितीन जीवने यांनी निकाल दिला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे जावई वकील आशुतोष राठोड यांनी घेतलेला आक्षेपही फेटाळला आहे. माणिकराव कोकाटे यांची आमदारकीला कोणताही धोका नसल्यामुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राहुल गांधी यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा कोकाटे यांच्या वकिलाने दाखला दिला. अब्रू नुकसान दाव्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलासा दिला होता. कोकाटे यांच्या विरोधात दिलेला कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळावी अशी मागणी केली होती. नितीन जीवने यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान झालेल्या युक्तिवादात कोकाटे यांची बाजू मांडताना वकील म्हणाले की, 1995 ते 2025 पर्यंत कोकटे यांच्यावर एकही केस नाही. सलग अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत.
दरम्यान, 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर केला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. त्यानंतर नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावली होती. या निर्णयाविरोधात कोकाटे यांनी वरच्या कोर्टात धाव घेतली होती. मागील आठवड्यात कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड ठोठावला होता.
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा…
बलात्कार पीडितेचे नाव, फोटो शेअर केल्यास शिक्षा…
प्रियकराला विष घालून ठार मारणाऱ्या प्रेयसीला फाशीची शिक्षा…
बापरे! सासऱ्याच्या प्रेमविवाहाची सुनेला साताजन्माची शिक्षा…
लाच घेतल्या प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा व 12 हजार द्रव दंड…
पुणे अपघात! निबंध लिहण्याची ‘कठोर’ शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात…

