घाटंजी येथील कज्जूम कुरेशी यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील दैनिक मतदार वृत्तपत्राचे वार्ताहर कज्जूम करीम कुरेशी (वय 43) याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मीला जोशी – फलके यांनी ₹ 25,000 च्या जात मुचलक्यावर (P.R. BOND) मंजूर केला.

अर्जदार कज्जूम कुरेशीतर्फे ॲड. एम. व्ही. रॉय यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली. आरोपीने सदर प्रकरणात महाराष्ट्र शासन तर्फे पोलिस स्टेशन घाटंजी व तक्रारदार/फिर्यादी विलास गोविंदराव सिडाम यांना प्रतिवादी केले होते, हे विशेष. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने जामीन मंजूर करतांना आरोपीने तपास कार्यात सहकार्य करण्यासाठी दर रविवारी सकाळी 10 ते दुपारी 1.00 वाजता घाटंजी पोलिस ठाण्यात हजेरी लावणे. तसेच तपासा दरम्यान साक्षीदारांवर दबाव आणू नये. या अटीवर आरोपी कज्जूम कुरेशी याचा अटक पुर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

घाटंजी येथील एका वार्ताहराने घाटंजी पोलिस स्टेशन मधील सेवानिवृत्त पोलिस उप निरीक्षक विलास गोविंदराव सिडाम (वय 58) यांस 15,000 रुपयाची खंडणी मागून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी आरोपी कज्जूम कुरेशी (वय 44) विरुद्ध भारतीय न्याय संहिता 308 (2), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा 1989 ॲट्रोसीटी ॲक्ट 3 (1) (r), 3 (1) (S) 3 (2) (va) अंतर्गत गुन्हे दाखल केले होते. सदर प्रकरणात आरोपी वार्ताहर कज्जूम कुरेशी याने यवतमाळचे जिल्हा न्यायाधीश – 2 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. लऊळकर यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, आरोपी वार्ताहर कज्जूम करीम कुरेशी याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. नरेंद्र पांडे यांनी शासनाची बाजू मांडली होती. सदर प्रकरणाचा तपास पांढरकवडा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने हे करीत आहे.

घाटंजी पोलिस स्टेशनचे सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक विलास सिडाम हे दिनांक 30 जून 2024 रोजी सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने सद्या ते संपूर्ण कुटूंबासह पोलिस स्टेशनच्या क्वार्टर मध्ये राहत आहे. तथापि, दैनिक साहसिक व दैनिक मतदारचे घाटंजी येथील वार्ताहर कज्जूम कुरेशी यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो, असे सिडाम यांचे म्हणणे आहे. तसेच सिडाम यांचे निवृत्ती वेतनाचे पैसे मिळायचे असल्याने ते पोलिस स्टेशनच्या सरकारी निवासस्थानी वास्तव्य करित आहे. तेव्हा, वार्ताहर कज्जूम कुरेशी यांनी सिडाम यांना सांगितले की, तुम्ही सरकारी क्वार्टर सोडत नाही म्हणून ‘मी तुमची बातमी तयार केली आहे’. अगर पेपर में नहीं छापना है तो, मुझे 15,000 रुपये देना पडेगा, असे सिडाम यांना म्हटले. तेव्हा, सिडाम यांनी सांगितले की, मला एक दोन महिने सरकारी क्वार्टर मध्ये थांबायचे आहे. नंतर माझ्या घराचे बांधकाम झाल्यावर मी स्वतः सरकारी क्वार्टर सोडून जाणार आहो, असे सिडाम यांनी म्हटले. ‘अगर तुम पैसे नही दिये तो मैं तुम्हारी बातमी पेपरमें छापता’, अशी धमकी वार्ताहर कज्जूम कुरेशी यांनी सिडाम यांना दिली. तेव्हा, सिडाम यांनी सद्या माझ्या जवळ 2,000 रुपये आहे व पैसे भेटायचे आहे. सद्या तंगी आहे, असे सिडाम यांनी सांगितले. तरीही संबंधित वार्ताहराने मला 15,000 रुपये द्या म्हणून सिडाम यांच्या मागे तगादा लावला व सद्याचे 2000 रुपये तरी द्या. उर्वरित रक्कम उद्या द्या, असे वार्ताहर कज्जूम कुरेशी यांनी सिडाम यांना सांगितले. तेव्हा, सिडाम यांनी म्हटले की, मेरे पास अभी पैसे नही जमते. बादमें देखेगें असे म्हणून सिडाम हे आपल्या पोलिस स्टेशनच्या सरकारी क्वार्टरकडे निघून गेले. दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी व्हाॅटसॲप ग्रुप वर विदर्भ मतदार या वृत्तपत्राची एक बातमी आली. त्या बातमीत सिडाम हे राहत असलेल्या पोलिस स्टेशन क्वार्टरची बातमी वार्ताहर कज्जूम कुरेशी यांनी प्रकाशित केली होती, असा आरोप सिडाम यांनी केला. त्यामुळे पेपरला बातमी आल्याने सिडाम यांची मानहानी व बदनामी झाली, असे त्यांनी सांगितले.

दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी सिडाम हे मार्केट मध्ये भाजीपाला आणण्यासाठी गेले होते. भाजीपाला घेऊन परत येतांना पोलिस स्टेशनच्या दाराजवळ वार्ताहर कज्जूम कुरेशी हा बाजूला मोटार सायकल लाऊन उभा होता. तेथुन सिडाम हे जात होते. तेव्हा, संबंधित वार्ताहर कज्जूम कुरेशी यांनी सिडाम यांना आवाज देउन थांबविले व म्हणाला की, ‘जम गई क्या बातमी’. तेव्हा, सिडाम यांनी सांगितले की, ‘भैय्या मैने तुमको 2000 रुपये दिये और भी देता करके बोला था’. तो भी तुमने मेरे खिलाफमें तुम्हारे पेपर में बातमी प्रकाशित की है, असे म्हटले असता बाकी के पैसे अभी देदो, नही तो सभी पेपर में तुम्हारे फोटो के साथ न्युज लगायेंगे, अशी धमकी दिली. विशेष म्हणजे वार्ताहर कज्जूम कुरेशी विरुद्ध या पुर्वीही घाटंजी पोलिस ठाण्यात काही प्रकरणात गुन्हे दाखल असुन, त्यात खंडणीच्या गुन्ह्याचा सुद्धा समावेश आहे, हे येथे उल्लेखनीय. सदर प्रकरणाचा पुढील तपास पांढरकवडा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने हे करीत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!