भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा छापा; मोठं घबाड हाती…

भुवनेश्वर (ओडिशा): भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा छापा ओडिशामध्ये टाकण्यात आला असून, हा छापा 10 दिवस सुरु होता. या छाप्यात आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी दारु बनवणारी कंपनी, बौध डिस्टिलरीज प्राइवेट लिमिटेडच्या अनेक विभागांमध्ये छापेमारी केली आहे. या दरम्यान, 353 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

छाप्या दरम्यान, प्राप्तीकर विभागाने जमिनीखाली दडलेल्या मौल्यवान वस्तू ओळखण्यासाठी स्कॅनिंग व्हील असलेल्या मशीनचा वापर केला आहे. पैसे मोजण्यासाठी अनेक मशीन्सची वापर करण्यात आला होता. मोठं घबाड हाती लागल्यानंतर प्राप्तीकर विभागाने वेगवेगळ्या बँकांतील कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावले होते. ही मोठी रक्कम मोजण्यासाठी आणि पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने कर्मचारी दाखल झाले होते.

आयकर विभागाने केलेल्या छापेमारीनंतर जप्त केलेले पैसे ट्रकवर लोड केले आणि कडेकोट बंदोबस्तात विभागाच्या कार्यालयात जमा केले आहेत. या ऑपरेशनच्या यशानंतर आयकर विभागाची कार्यापद्धती आणि अधिकाऱ्यांच्या शिस्तबद्धतेचे सर्वांकडून कौतुक होते आहे. केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये या छाप्याचे नेतृत्व करणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सन्मानित केले होते. यामध्ये आयकर विभागाचे अन्वेषण संचालक एसके झा आणि अतिरिक्त संचालक गुरप्रीत सिंह यांचा समावेश होता. हा छापा केवळ आयकर विभागाच्या यशाचे प्रतीक ठरला नाही, तर भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरुद्ध सरकारची कारवाई सुरूच असल्याचेही यातून सिद्ध झाले. दरम्यान, आयकर विभागातील या अधिकाऱ्यांचे सर्व स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.

क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याच्या घरात मोठं घबाड; दागिने अन् नोटांची थप्पी…

घबाड सापडलं! चेकपोस्टवर 190000000 रुपयांची सोनं-चांदी जप्त…

पोलिसांनी जप्त केले मोठे घबाड; रक्कम नेमकी कशासाठी…

नाशिकमध्ये सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळालं भलं मोठं घबाड….

लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या घरात सापडलं मोठं घबाड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!