मुंबईत थरार! पोलिसांपासून वाचण्यासाठी 10व्या मजल्यावर लटकला…

मुंबई : पोलिसांपासून वाचण्यासाठी एका आरोपीने बिल्डिंगच्या 10व्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी त्याचे प्राण वाचवले आहेत. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

काशिमिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (ता. १) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एनडीपीएस गुन्ह्याच्या आरोपीला पकडण्यासाठी हैदराबाद पोलिस आले होते. पोलिसांपासून वाचण्यासाठी या आरोपीने इमारतीच्या 10व्या मजल्याच्या बाल्कनीतून पळून जायचा प्रयत्न केला. बाल्कनीतून पळून जाताना हा आरोपी अडकला त्यानंतर पोलिसांनी आणि अग्निशमन विभागाच्या जवानांनी त्याचे मतपरिवर्तन केले आणि दरवाजा तोडून त्याचे प्राण वाचवले.

दरम्यान, आरोपी खाली पडला तर त्याला पकडण्यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून जाळी लावण्यात आली होती. यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला समजावले आणि त्याचे मतपरिवर्तन करून त्याला वर आणले. स्थानिक पोलिस, हैदराबाद पोलिस आणि अग्निशमन विभागाच्या मदतीने त्याचे प्राण वाचवण्यात आले. आरोपीची सुटका झाल्यानंतर त्याला हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. काशिमिरा पोलिस, हैदराबाद पोलिस आणि अग्निशमन दलाच्या या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.

ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग अन् अल्पवयीन मुलीवर अत्याचार…

EVM हॅकिंगचा दावा करणाऱ्याविरोधात सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल…

Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…

विकृती! हस्तमैथून करून महिलांच्या अंतरवस्त्रावर टाकायचा वीर्य…

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरावर, कार्यालयावर ईडीचे छापे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!