
लोणावळा येथे टपरी धारकांवर सत्यसाई कार्तिक यांची कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): लोणावळा शहरातील ‘मॅगी पॉईंट’ येथे शर्ती पेक्षा जास्त वेळ आस्थापना चालू ठेवणा-या ५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.
लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीत मॅगी पॉईंट येथे शर्ती पेक्षा जास्त वेळ आस्थापना चालू ठेवणा-या ५ टपरी धारकांवर कारवाईचा बडगा उचलत त्यांचे वर खटले दाखल करण्यात आले आहेत. यापुर्वी वारंवार सुचना देऊन व कारवाई करुन ही मॅगी पॉईंट येथील टपरी धारक आपली टपरी रात्रभर चालू ठेवून तेथे मुंबई-पुण्याहुन येणा-या पर्यटकांना मॅगी व इतर खाद्य पदार्थांची विक्री करत असतात. त्यामुळे सदर ठिकाणी रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी स्वताः लक्ष घालून शर्ती पेक्षा जास्त वेळ टपरी चालू ठेवून खाद्य पदार्थ विक्री करणा-या टपरी धारकांवर कारवाई करुन त्यांचेवर खटले दाखल करण्यात येवुन परिणाम कारक कारवाई केली आहे. तसेच या पुढेही लोणावळा विभागात रात्री उशीरा पर्यंत आस्थापणातून खाद्य पदार्थांची विक्री करीत असल्याचे मिळुन आल्यास त्यांचेवर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई सहा. पोलिस अधिक्षक सत्यासाई कार्तिक लोणावळा उपविभाग यांचे मार्गदर्शना खाली सहा. पोलिस निरीक्षक राहुल लाड लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे पोशि/विकास कदम, होमगार्ड तिखे, होमगार्ड ठाकर यांनी केली आहे.
लोणावळा येथे गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तीक यांची कारवाई…
लोणावळा परिसरात घरफोडी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…
लोणावळा येथे पर्यटकांच्या वाहनांच्या काचा फोडून चोरी करणारा ताब्यात…
लोणावळा येथे संकल्प नशामुक्ती अंतर्गत नशेखोरांना न्यायालयाने ठोठावला दंड…
सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!