
पुणे! प्रेमप्रकरणातून महिलेची आत्महत्या; कागदाचे तुकडे जोडत पोलिसांनी उकललं गूढ…
पुणे : पुणे शहरातील चंदननगर परिसरात एका विवाहित महिलेने आत्महत्या केली. सुरुवातीला गुढ वाटणाऱ्या या आत्महत्येचा तपास करताना पोलिसांनी कचऱ्यात फेकून दिलेल्या आणि फाडलेल्या सुसाईड नोटचे तुकडे एकत्र केले आणि गुढ उकलले. या प्रकरणी पोलिसांनी करण शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मृत महिलेचे नाव पूजा (वय २७) असून ती कल्याणीनगरमधील एका खासगी कंपनीत रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. आरोपी करण शिंदे हा पूजाच्या पतीचा जवळचा मित्र होता. पतीनेच त्याला राहण्यासाठी आपल्या घरी जागा दिली होती. करणने पूजाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ही बाब पतीला समजताच घरात वाद सुरू झाले होते. काही काळानंतर पूजाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तिने पुन्हा पतीकडे परतण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या आई-वडिलांची माफी मागून पुन्हा संसार उभा करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, करणला हे मान्य नव्हते. तो तिला सतत जुने फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करू लागला. “तू पुन्हा संसार करू शकणार नाहीस,” अशा धमक्या देऊन त्याने तिचा मानसिक छळ सुरू केला.

पूजा ज्या कंपनीत काम करत होती, तिथल्या कचऱ्यात पोलिसांना कागदाचे काही तुकडे सापडले. पोलिसांनी पारदर्शक टेपच्या मदतीने हे सर्व तुकडे जोडले असता, ती पूजाने लिहिलेली सुसाईड नोट असल्याचे स्पष्ट झाले. त्यात तिने करण शिंदे कशाप्रकारे ब्लॅकमेल करत आहे, याचे सविस्तर वर्णन केले होते. तसेच तिच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्डिंग आणि व्यवहाराचे पुरावेही तिने नमूद केले होते.
पूजाने ९ फेब्रुवारी रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये तिने आपल्या पतीची, आई-वडिलांची आणि ९ वर्षांच्या मुलाची माफी मागितली आहे. “माझ्या मुलाची काळजी घ्या,” अशी भावनिक साद तिने चिठ्ठीत केली होती. पूजाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून चंदननगर पोलिसांनी करण शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पुणे! घरी सांगितले चेन्नईला जातोय अन् २४व्या मजल्यावरून मारली उडी…
पुणे! युवकाने प्रेमसंबंधातून संपवलं आयुष्य, दोन बहिणींवर गुन्हा…
पुणे! प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती अन् ससूनमध्ये…
पुणे! प्रेमीयुगुलाची विष प्राशन करून खडकवासला धरणाजवळ आत्महत्या…

