पुणे शहरात एका टाकीतून दुसऱ्या टाकीत गॅस भरताना स्फोट…

पुणे : पुणे शहरातील हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गॅसच्या टाकीतून दुसऱ्या टाकीमध्ये गॅस भरताना स्फोट झाला. स्फोटामुळे दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर मांजरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आगीची घटना समजताच अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. पोलिस पुढील तपास करत आहेत. बेलेकर वस्ती, मांजरी येथील एका गोडाऊनमध्ये भारत गॅसच्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून दुसऱ्या टाकीत बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असताना मोठा स्फोट झाला. यामध्ये कामगार प्रेम राव शेख (वय ४७, रा. हांडेवाडी, हडपसर) आणि रमेश रतन कुरूमकर (वय २९, रा. विघ्नहर्ता पार्क, गवळी वस्ती, मांजरी) हे दोघे गंभीर जखमी झाले.

निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!

याप्रकरणी पोलिसांनी गोडाऊन मालक सुमित सुनील घुले (वय ४०, रा. वृंदावन सोसायटी, बेलेकर वस्ती, मांजरी) याला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती हडपसर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली.

पुणे शहरात मध्यरात्री खुनाचा थरार, घरात घुसून झाडल्या गोळ्या अन्…

सहकारनगर पोलिसांनी दोन सराईत गुंडांना केले जेरबंद…

गर्लफ्रेंन्डला इंप्रेस करण्यासाठी चोरले तब्बल १५ मोबाईल अन्…

विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीमधील टोळीवर मोक्का; ७२वी कारवाई…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!