
इनोव्हाच्या डिक्कीतून बाहेर लटकलेल्या हाताबाबत पोलिसांनी सत्य आणलं समोर…
मुंबई: नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशनदरम्यान एका इनोव्हा गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर लटकलेल्या अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र, या कारचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यामागील सत्य समोर आले आहे.
इनोव्हामधून बाहेर लटकणारा हात हा मृत शरीराचा आहे किंवा कोणाचे अपहरणं करुन नेण्याचा प्रयत्न झाला का? याबद्दल रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना शंका वाटत होती. एका वाहन चालकाने आपल्या कारमधूनच हात डिक्कीबाहेर लटकत असलेल्या इनोव्हाचा विडिओ काढला आणि यासंदर्भात पोलिसांकडे देखील तक्रार दाखल केली. संबंधित व्हिडीओ पाहून पोलिस यंत्रणा कामाला लागली आणि व्हिडीओत दिसणाऱ्या कारच्या क्रमांकावरुन आधी कार आणि कार मालक शोधून काढल्यानंतर हा प्रकार काय आहे याचा खुलासा झाला.
तपासादरम्यान, कारच्या डिक्कीतून बाहेर लटकणारा हात हा कोणत्याही मृतदेहाचा किंवा व्यक्तीचा नसून सदर व्हिडीओ केवळ मनोरंजनसाठी शूट करण्यात आला. एका रील बनवण्याच्या नादात काही अतिउत्साही युवकांनी हा विचित्र प्रँक व्हिडीओ शूट केल्याचे समोर आले आहे. संबंधित व्हिडिओ पोलिसांना मिळताच पोलिसांनी गाडीच्या क्रमांकावरुन तिचा शोध घेतला. पोलिसांनी रील बनवणाऱ्या युवकांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. यावेळी रील बनवण्यासाठी डिकीत बसलो आणि हात खाली लटकत ठेवला होता असे मुलांनी पोलिसांना सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
संतापजनक! पत्नीच्या गुप्तांगाला हळदी-कुंकू लावत पिळले लिंबू…
भामट्याने हळदी समारंभात जेवण केले अन् १४ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला…
एन्काऊंटरची ऑफर! दारुच्या नशेत माणूस खरं बोलतो : करुणा शर्मा
अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी…
नागपूर हादरलं! चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीने केली हत्या…

