तुळजाभवानी मंदिराची बनावट वेबसाईट, अ‍ॅप बनवून भाविकांना गंडा…

धाराशिव : तुळजाभवानी मंदिराची बनावट वेबसाईट आणि अ‍ॅप तयार करून भाविकांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विजय बोदले असे आरोपीचे नाव आहे.

तुळजाभवानी मंदीर प्रशानाची कसलीही परवानी न घेता नावाशी साधर्म्य असणारे वेबसाईट व मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले. तुळजाभवानी देवीचा फोटो व लोगो वापरुन हे श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानाचे अधिकृत अ‍ॅप असल्याचे भाविकांना भासवण्यात आले. त्या माध्यमातून वेगवेगळ्या पुजांच्या नावाखाली भाविकांकडून पैसे उकळण्यात आले. मंदीर संस्थान आणि भाविकांची फसवणूक करण्यात आली आहे.

तुळजापूरमधील रहिवासी असलेला विजय बोदले याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 417, 419, 420 कलम 66(सी), 66(डी) आयटी ॲक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, कोरोना कालावधीत मध्ये देखील तुळजाभवानी मंदिर संस्थानाची बोगस वेबसाईट बनवल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर आता हा दुसऱ्यांदा प्रकार समोर आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

आयपीएस अतुल कुलकर्णी: जमिनीवर राहून काम करणारा अधिकारी…

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे कार्य कौतुकास्पद: पद्मश्री कल्याण सिंह रावत

पोलिसांच्या गाडीला पाठीमागून जोरात धडक; दोन ठार…

हृदयद्रावक! आश्रम शाळेच्या बाथरूममध्ये आढळला चिमुकल्याचा मृतदेह…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!