पिंपरी-चिंचवडमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती; साडूने केला खून…

पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात आंतरधर्मीय विवाह केला म्हणून मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने मृतदेहाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळून तुकडे स्वरूपातील अवशेष नदीपात्रात फेकले होते.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील आदर्श नगर येथे 15 जूनला ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात अमीर शेख (वय 25) या युवकाचा मृत्यू झाला आहे. अमीर शेख याने पंकज विश्वनाथ पाईकराव याच्या मेव्हणीसोबत आंतरधर्मीय लग्न केले होते. याचाच राग मनात धरून पंकज विश्वनाथ पाईकराव याने आपल्या मेहुण्यांच्या मदतीने हे कृत्य केले आहे. या प्रकरणात एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील चारही आरोपींच्या विरोधात भादवि कलम 364, 302, 201, 120 ब आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली आहे. गणेश दिनेश गायकवाड हा आरोपी फरार आहे.

आरोपी पंकज विश्वनाथ पाईकराव याने सुशांत गोपाळ गायकवाड, गणेश दिनेश गायकवाड आणि त्यांचा मित्र सुनील किशन चक्रनारायण याच्या मदतीने 15 जूनला अमीर मोहम्मद शेख याला दारू पिण्यासाठी बोलवले. आरोपींनी मोशीमधील आदर्श नगर येथून अमीर शेख याचे अपहरण केले आणि तिथेच त्याची हत्या केली. या प्रकरणात पोलिस अधिकचा कसून तपास करत आहेत.

प्रेमाची सैराट कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह अन् पुढे…

सैराटची पुनारवृत्ती! प्रेमविवाहानंतर बाप आणि भाऊ चिडला अन्…

सैराटची पुनारवृत्ती! आर्ची-परशासारखेच दोघांना संपवलं…

प्रेमविवाह केल्यामुळे चिडलेल्या बापाने केली मुलाची हत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!