
नाशिकमध्ये एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात, 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू…
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर एसटी आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहूड जवळ एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात पाच प्रवासी ठार झाले असून इतर प्रवासी जखमी झाले आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहतुक विस्कळीत झाली होती.
एसटी बस जळगाव येथून नाशिकला जात असताना ओवरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. अपघातात इतका भीषण आहे की एसटीची एक बाजू पूर्णपणे कापली गेली. त्यामुळे त्या बाजूला बसलेल्या प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने मदत कार्य सुरु केले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
वऱ्हाडाच्या स्कॉर्पिओवर खडीचा हायवा पटली; सहा जणांचा मृ्त्यू…
नाशिकच्या गुंडा विरोधी पथकाने ‘बारक्या’ला पुण्यातून ठोकल्या बेड्या…
नाशिक पोलिसांनी कोट्यावधींचा मुद्देमाल तक्रारदारांना केला परत…
नाशिक-दिंडोरी मार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू…
संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

