
प्रेमाची सैराट कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह अन् पुढे…
कल्याण : बहिणीने ड्रायव्हरसोबत लग्न केल्यामुळे संतापलेला भावाने गुंड पाठवून बहिणीच्या पतीला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकावर घडली आहे. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सात जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
राधेश्याम चौधरी, इम्तियाज यासिन,आशिष कुमार प्रसाद, उमेश गौतम, अस्लम शहाबुद्दीन शेख, रिजवान अहमद, अनुप चौधरी अशी अटक आरोपींची नावे आहेत. रेल्वे पोलिसांनी या मुलीच्या भावाचा शोध सुरू केला आहे. उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यात युवती आपल्या कुटुंबासह राहते. तिचे खुदिराम चौधरी याच्याशी प्रेम संबंध होते. खुदीराम हा कामानिमित्त कल्याण जवळील बनेली येथे राहतो, तो चालक आहे. या दोघांनी सप्टेंबर 2023 मध्ये लपून प्रेमविवाह केला होता. या प्रेमविवाहबाबत कुटुंबात कोणालाही माहिती नव्हती. खुदीराम हा ड्रायव्हर असल्याने अनुष्काच्या कुटुंबीयांचा त्याला विरोध होता. 25 एप्रिल रोजी अनुष्का घरातून अचानक बेपत्ता झाली होती
अनुष्काच्या नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला होता. अनुष्काच्या भावाने याबाबत नाशिक आणि मुंबई येथे राहणाऱ्या नातेवाईक आणि मित्रांना माहिती देत अनुष्काला परत आणा असे सांगितले. अनुष्काच्या भावाचे तीन मित्र नाशिकमधून गोरखपूर एक्सप्रेसमध्ये घुसले, फोटोच्या आधारे एक्सप्रेसमध्ये अनुष्काचा शोध घेतला. याच दरम्यान त्यांना अनुष्का दिसली त्यांनी अनुष्काचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला, मात्र याच वेळेला खुदीराम याने त्यांना फोटो काढताना पाहिले. खुदीरामने या युवकांना फोटो का काढता? याबाबत जाब विचारला तोपर्यंत ट्रेन कल्याण रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. अनुष्काच्या भावाचे आणखी चार मित्र हे कल्याण रेल्वे स्थानकावर गोरखपुर एक्सप्रेसची वाट बघत होते. ट्रेन रेल्वे स्थानकावर पोहोचताच सहा ते सात जणांनी अनुष्का आणि खुदिराम याला घेरले. त्यांनी खुदीराम याला बेदम मारहाण केली आणि अनुष्काला आपल्या दिशेने खेचले.
कल्याण रेल्वे स्थानकात हा प्रकार घडत होता. याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना मिळाली. कल्याण रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मारहाण करणाऱ्या सात जणांना ताब्यात घेतले आहे. बहिणीने एका ड्रायव्हरसोबत लग्न केलं या रागातून या मुलीच्या भावानेच हे गुंड पाठवले, खुदिराम याला मारहाण करत अनुष्काला पुन्हा घेऊन येण्यास सांगितले असल्याचे उघड झाले आहे.
सैराटची पुनारवृत्ती! प्रेमविवाहानंतर बाप आणि भाऊ चिडला अन्…
सैराटची पुनारवृत्ती! आर्ची-परशासारखेच दोघांना संपवलं…
सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या…
धक्कादायक! प्रेमविवाहाला मदत केली म्हणून युवकाला बोलेरोखाली चार वेळा चिरडले…
भावाने सख्ख्या विवाहित बहिणीची केली हत्या; कारण समोर…

