राहुरी-शनीशिंगणापूर मार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू…

अहिल्यानगर : राहुरी-शनीशिंगणापूर मार्गावर रोडवरील उंबरे (ता. राहुरी) गावाच्या हद्दीत तांबे पेट्रोलपंपाजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि रिक्षाची जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत रिक्षातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर टेम्पो ट्रॅव्हलरही रस्त्याच्या कडेला पलटी झाला आहे.

शनीशिंगणापूरकडे जाणारा भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर राहुरीकडून येणाऱ्या रिक्षावर आदळला. यावेळी झालेल्या भीषण अपघातात रिक्षामध्ये बसलेले पाच प्रवासी गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र अधिकृत आकडेवारी आणि ओळख पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.


पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

टेम्पो ट्रॅव्हलरमधील प्रवासीही या अपघातात जखमी झाले असून, काहींना गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने राहुरी व अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे काही काळ शनीशिंगणापूर रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून, वाहतूक सुरळीत केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! साताऱ्यात थरकाप उडवणारा अपघात; शिक्षिकेचा जागीच मृत्यू…

नाशिक! करोनात पतीचं निधन अन् महिलेचा अपघाती मृत्यू; 5 लेकरं…

पुणे! नवीन थारने कोकणात जाताना अपघातात सहा मित्रांचा मृत्यू; पाहा नावे…

सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू…

Video: पुणे शहरातील नवले पुलाजवळ नेमका कसा घडला अपघात, ८ जणांचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!