
हृदयद्रावक Video! बहिणीच्या लग्नात नाचताना युवतीचा मृत्यू…
भोपाळ (मध्य प्रदेश): लग्न समारंभामध्ये नृत्य करत असताना एका युवतीचा स्टेजवर हृदविकाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत.
विदिशा जिल्ह्याच्या मगधम रिसॉर्टमध्ये लग्न समारंभ सुरू होता. या लग्नासाठी इंदूरहून परिणीता जैन ही युवती आली होती. परिणीताच्या बहिणीचं लग्न होते. लग्नामध्ये डान्ससाठी स्टेजही बनवण्यात आले होते. बहिणीच्या लग्नानिमित्त परिणीता जैन आनंदात डान्स करत होती. पण अचानक ती स्टेजवरच कोसळली. यामुळे एकच गोंधळ उडाला. परिणीता कोसळल्यानंतर लग्नात उपस्थित असलेले लोक घाबरले. सुरूवातीला लोकांना परिणीताची ही डान्स स्टेप असल्याचे वाटले, पण परिणीता उठत नसल्याचे पाहून तिकडे उपस्थित असलेले नातेवाईक स्टेजवर धावत गेले, तेव्हा परिणीताचा मृत्यू झाला होता. नातेवाईक परिणीताला घेऊन रुग्णालयात गेले. पण, परिणीता हिला तपासल्यानंतर हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, लग्न समारंभ सुरू असताना परिणीताने स्टेजवर जवळपास तीन मिनिटं डान्स केला, तिचा डान्स पाहून नातेवाईकांनी टाळ्याही वाजवल्या. डान्स करत असतानाच ती स्टेजवर पडली आणि मृत्यू झाला. परिणीताला कोणताही गंभीर आजार नव्हता, तसेच तिचा प्रकृतीही व्यवस्थित होती, अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली.
ये तो बहुत दुखद हुआ ! विदिशा में डांस करते समय युवती की मौत, नाचते-नाचते स्टेज पर ही गिर पड़ी, इंदौर से अपनी बहन की शादी में शामिल होने आई थी @VistaarNews pic.twitter.com/ziQysP9ua1
— Brajesh Rajput (@drbrajeshrajput) February 9, 2025
Video: हिंजवडीत सिमेंट मिक्सरखाली चिरडून दोन आयटी इंजिनियर युवतींचा मृत्यू…
दुचाकी आणि सेल्फीच्या नादात मृत्यू, अपघात कॅमेरात कैद, पाहा Video…
Video: मृत्यू समोरून वेगाने आला अन् एक क्षणात…
हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…
Video : गणपतीच्या मंडपात नाचताना युवकाचा मृत्यू झाला कॅमेरात कैद…
Video: हलक्या काळजाचे असाल तर हा व्हिडीओ पाहू नका…

