शिवानी कळमेकर प्रकरणात मुख्यमंत्र्यांची धक्कादायक माहिती…

मुंबईः बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधील शिवानी कळमेकर हिची हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तिच्या वडील आणि भावाला अटक केली होती. मात्र, काही दिवसांनी शिवानी स्वतः जिवंत पोलिसांसमोर हजर झाली, ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले. यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनाही निलंबनाला समोर जावे लागले आहे.

शिवानी कळमेकर प्रकरणात चुकीच्या तपासासाठी आणि निष्पाप दोघांना गोवल्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर, जळगाव जामोदचे दोन पोलिस निरीक्षक निलंबित करण्यात आले. राज्याचे पोलिस महासंचालकांनी या प्रकरणातील पोलिसांची मोठी चूक असल्याचे कबूल केले होते. यानंतर आज पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणावर भाष्य करत पोलिसांची चूक झाल्याचे मान्य केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शिवानी कळमेकर प्रकरणाबाबत मुद्दा मांडला. यावर पोलिसांनी निर्दोष कुटुंबाला मुलीच्या हत्येत अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती मुलगी शिवानी कळमेकर स्वत: हजर झाल्यावर पोलिसांनी त्या कुटुंबाला सोडले. अनेक व्हिडीओ आहेत. मीडियासमोर ते आले आहेत. त्या कुटुंबावर दबाव टाकण्यात आला होता. हे मीडियात आले आहे. अधिकारी यांना चूक केले म्हणून निलंबित केले. मात्र त्याच्यापेक्षा कडक कारवाई करावी, बरखास्त करावे, जेणेकरून मेसेज जाईल, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. रोहित पवार यांच्या या मागणीवर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

रोहित पवार यांनी वस्तुस्थिती सांगितली. लाजिरवाणे काम पोलिसांनी केले आहे. बेपत्ता मुलीची केस होती. एक बॉडी सापडली, तर ती तिचीच असल्याचा दावा कुठलाही रिपोर्ट न करता केले. तिच्या भावाला व वडिलांना पोलिसांनी खून केला म्हणून पकडले. सदर मुलगी जिवंत मुलगी पोलिसांसमोर हजर झाली. म्हणून त्यांना सोडले. पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे त्या मृतदेहाची ओळख पटवण्यायचे काम सुरु आहे. मात्र, या घटनेशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी हे निलंबित केले आहे. त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार आहे. ज्यांचा थेट संबंध असेल, त्यांना निष्कासित केले जाईल. जे पीडित कुटुंब आहे, त्यांना शासनाकडून आर्थिक मदत केली जाईल. विभागीय चौकशी 3 महिन्यात पूर्ण केली जाईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

धक्कादायक! मृत नवरी निघाली जिवंत अन् थेट पोहचली पोलिस स्टेशनला…

नवविवाहितेला नको त्या अवस्थेत, नको त्या व्यक्तीसोबत पाहिले अन्…

प्रियकराच्या सांगण्यावरून नर्सने केला नवऱ्याचा सलाईनमधून क्रुर मर्डर…

नवविवाहित युवतीचा मृत्यूने उडाली खळबळ; मृत्यूच्या ३ तास ​​आधी…

पुणे! प्रेमविवाह केल्यानंतर नवऱ्याचे अनैतिक संबंध पत्नीला समजले अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!