बारामती पुन्हा हादरली! युवकाचा कोयत्याने वार करून खून…

बारामती: बारामती काही दिवसांपुर्वी एका महाविद्यालयामध्ये कोयत्याने वार करून विद्यार्थ्यांचा खून करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या रस्त्यावर रात्री अनिकेत सदाशिव गजाकस (वय 23) या युवकाचा कोयत्याने निघृण वार करत खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अनिकेत हा मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अभिषेक सदाशिव गजाकस यांच्या फिर्यादीवरुन बारामती शहर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक गजानन ठेके करत आहेत. बारामतीमध्ये गेल्या सहा महिन्यातील हा तिसरा खून आहे.

अनिकेत सदाशिव गजाकस या युवकारवर गुरुवारी (ता. १९) रात्री साडे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास प्रगतीनगर परिसरातील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद कॉलेज रस्त्यावर कोयत्याने वार करण्यात आले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अनिकेत गजाकस याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नंदकिशोर पंजाबराव अंभोरे (रा प्रगतीनगर ता बारामती जि पुणे), महेश नंदकुमार खंडाळे (रा. तांदुळवाडी रोड जिजामातानगर बारामती जि.पुणे) संग्राम खंडाळे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अभिषेक सदाशिव गजाकस यांनी बारामती शहर पोलिसांकडे फिर्याद दिली असून, पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक गजानन चेके करत आहेत.

बारामती हादरली! महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सपासप वार करत खून…

बारामतीजवळ मोटार अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू…

बारामतीत बैलावरून वाद! गोळीबारातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू…

बारामतीमध्ये कोयता हल्ल्यात कॉलेज युवकाची हत्या…

बारामतीमध्ये चोरी करण्यासाठी आरोपींनी चक्क ज्योतिषाकडून काढला होता मुहूर्त पण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!