Video: युवतीला चुकीचे इंजेक्शन अन् आई-वडिलांसमोरच सोडला जीव…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका १८ वर्षांच्या युवतीला चुकीचे इंजेक्शन देण्यात आले होते. रुग्णालयाच्या बाहेरच तिने आई-वडिलांसमोरच तडफडत जीव सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, संबंधित युवती दोन दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होती. युवतीवर चुकीचे उपचार करण्यात आले होते. यानंतर तिची प्रकृती बिघडली असता उपचार करण्याऐवजी रुग्णालयाने तिला बाहेर काढले आणि मुलीला कुटुंबाकडे सोपवले. युवती रुग्णालयाबाहेर तडफडत मृत पावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. युवती बाईकवर बेशुद्ध अवस्थेत बसलेली असून आई-वडिलांनी तिला पकडून ठेवल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन केले आहे. आरोपी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी फरार आहेत. दरम्यान, रुग्णालयाला पोलिसांनी सील केले आहे.
मैनपुरीच्या करहल रोडवर असणाऱ्या राधास्वामी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. येथे 11 वीत शिकणाऱ्या 18 वर्षीय मुलीला ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुटुंबाने केलेल्या आरोपानुसार, डॉक्टरांनी तिच्यावर चुकीचे उपचार केले. दोन दिवस रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिची प्रकृती आणखी बिघडू लागली. यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता. तेथील कर्मचाऱ्यांनी मुलीला रुग्णालयाबाहेर काढले. त्यावेळी मुलगी बेशुद्ध अवस्थेत दिसत आहे. रुग्णालयातील कर्मचारी तिला बाईकवर बसवून निघून जातात. एक व्यक्ती तिला पकडून उभा असतो. तिथे उभी असणारी महिला रडताना दिसत आहे. योग्य उपचार न मिळाल्याने अखेर मुलीला तिचा जीव गमवावा लागला.
मुलीच्या मृत्यूनंतर मृतदेह तिथेच सोडून रुग्णालयातील सर्व कर्मचारी फरार झाले असा कुटुंबाचा आरोप आहे. मुलीवर उपचार करणारा डॉक्टर रवी यादव हा देखील फरार आहे. हे प्रकरण तापल्यानंतर आरोग्य विभाग आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर मुलीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. रुग्णालयातील इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, रुग्णालयाला टाळे ठोकण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे रुग्णांवर उपचार करणारा डॉक्टर रवी यादव याच्याकडे कोणतीही डिग्री नसल्याचे समोर आले आहे.
In UP’s Mainpuri, a 17-year-old girl suffering from fever died allegedly after she was administered wrong injection at a private hospital. Her body was later abandoned outside hospital by the staff as the family tried to take it away on a motorcycle. pic.twitter.com/yhQtRcDdOF
— Piyush Rai (@Benarasiyaa) September 28, 2023
दिशा भोईटे हिच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन; चौकशीची मागणी…
हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…