वहिनी आणि दिराचे पाच वर्षांपासून प्रेमसंबंध अन् पुढे…

पाटणा (बिहार): मुझफ्फरपूरमध्ये वहिणी आणि दिरामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर वहिणीने नवऱ्याचे घर सोडले आणि दिरासोबत राहू लागली. पण, पुढे नवरा व दीर दोघांनीही पाठ आहे. त्यामुळे महिलेनं सरपंचाचा मुलगा असलेल्या त्या दीराच्या घराबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे,

सरपंचाचा मुलगा असलेल्या तिच्या दीरानं तिला फसवल्याचा आरोप महिलेने केला आहे. काही दिवसांपूर्वी ती व तिचा दीर घरातून पळून दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी लग्न केलं; मात्र एका महिन्यानंतर तिचा दीर तिला तिथेच सोडून फरार झाला. अहियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या जमालाबादमध्ये ही घटना घडली आहे. गेल्या सात दिवसांपासून किरण देवी नावाची महिला सरपंचाच्या घराबाहेर धरणं धरून बसली आहे. सरपंचाचा मुलगा मनीष तिचा दीर आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरू होते. महिन्याभरापूर्वी ते दोघे दिल्लीला पळून गेले. तिथे एका मंदिरात त्यांनी लग्न केले व नंतर महिन्याभराने तिचा दीर पळून गेला. दिल्लीवरून गावी आल्यावर नवऱ्याने स्वीकारण्यास नकार दिला. सासऱ्यानेही घरात घेतले नाही. किरण देवी यांना एक लहान मुलगा आहे. त्यांना दीर मनीषसोबतच राहायचे आहे; मात्र तो सध्या फरार आहे.

जमालाबाद इथे राहणाऱ्या किरण देवी यांचे सहा वर्षांपूर्वी प्रमोद दास यांच्याशी लग्न झाले होते. मनीष त्यांचा दीर होता. दोघांमध्ये पुढे प्रेमसंबंध जुळले. त्याच दरम्यान किरण देवी यांना मुलगाही झाला; मात्र मनीषच्या दिल्लीला पळून जाण्याच्या बोलण्यामुळे आपण फसल्याचा किरण देवी यांचा आरोप आहे. मनीष दिल्लीमध्ये मजुरी करत होता. मात्र, तिथे गेल्यावर किरण देवी यांना सोडून तो फरार झाला. किरण देवी यांनी आरोप केले असले तरी अहियापूर पोलिसांनी मात्र तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाबाबत कारवाई केली जाईल, असे म्हटलं आहे. किरण देवी गेल्या सात दिवसांपासून गावातल्या सरपंचांच्या घराबाहेर बसून आहेत.

धक्कादायक! वहिनीने मध्यरात्रीच्या सुमारास दिराला बेडरुममध्ये बोलावलं अन्…

वहिनी आणि दिराचे अनैतिक संबंध! नवऱ्याला चहा द्यायची अन्…

वाईट नजर! वहिनीच्या बेडरूममध्ये घुसला दीर अन् पुढे…

दीर आणि वहिणीचे जुळले प्रेमसंबंध; नवऱ्याला समजले अन्…

वहिनी आणि दिराचे प्रेमसंबंध! गरोदरपणात लावले पतीने लग्न…

वहिनीच्या खोलीत मध्यरात्री घुसताना एकाला दिराने पाहिले अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!