धावत्या कारमध्ये प्रेमीयुगलाचे अश्लील चाळे अन् पोलिसांची कारवाई…

नागपूर : नागपुरातील उच्चभ्रू भाग असलेल्या धरमपेठमधून एका धावत्या कारमध्ये प्रेमीयुगलाचे अश्लील चाळे सुरू होते. रस्त्याने जाणाऱ्या दुसऱ्या प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ काढला आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की कार चालवत असलेल्या युवकाच्या मांडीवर बसून युवती अश्लील चाळे करत आहे. अतिशय धोकादायक पद्धतीने युवती स्टेरिंगवर बसून अश्लील चाळे करत असल्याचे दिसत आहे. यामुळे अपघात होण्याचीही शक्यता होती. जोडप्याने स्वतःसोबतच इतरांचाही जीव धोक्यात घातला. रस्त्याने जाणारे येणारे नागरिक पाहात असतानाही दोघांचे अश्लील चाळे सुरूच होते. लक्ष्मीभुवन चौक ते शंकर नगर दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनीही कारवाई केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी वाहनाचा शोध घेत प्रेमीयुगुलाला ताब्यात घेतले आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारा प्रियकर हा CA तर प्रेयसी इंजिनिअर असल्याचे समोर आले आहे.

संबंधित घटना15 जुलै रोजी सायंकाळी घडली आहे. दोघेही सीताबर्डी परिसरात गेले होते. रेस्टॉरंटमध्ये काही वेळ घालवल्यानंतर रस्त्याने परत जाताना त्यांनी हे चाळे केले. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यात कारचा क्रमांकही दिसला. पोलिसांनी कारच्या क्रमांकावरून सूरजच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यांनी कार सूरजकडे असल्याचे सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी सूरजला बोलवले होते.

पुणे जिल्ह्यात कारचा टायर फुटल्याने काँग्रेस नेत्याच्या मुलाचा मृत्यू…

Video क्रुरपणाचा कळस! बैलावर हल्ला करून कुऱ्हाड पाठीतच खुपसली…

ड्रिंक अँड ड्राइव्ह करणाऱ्यांना पुणे पोलिसांचा इशारा; थेट लायसन्स होणार रद्द…

हिट ऍण्ड रन! ओळख लपवण्यासाठी गाडीतच कापले केस आणि केली दाढी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!