दुबईवरून प्रेयसी आल्याचे पाहताच कुलूप लावून ठोकली धूम…
लखनौ (उत्तर प्रदेश): दुबईतील एक युवती प्रियकराचा शोध घेत उत्तर प्रदेशातील त्याच्या घरी पोहोचली. पण, प्रेयसीला पाहताच प्रियकराच्या कुटुंबीयांनी घराला कुलूप लावून धूम ठोकली. यामुळे प्रेयसी गेल्या 7 दिवसांपासून प्रियकराच्या घराबाहेर बसून आहे. या घटनेची परिसरात चर्चा रंगली आहे.
दुबौलिया पोलिस स्टेशन हद्दीतील रामनगर गावात राहणारा राजकुमार याची जालंधर (पंजाब) येथील एका युवतीसोबत दुबईत भेट झाली होती. दोघे तेथे गेल्या तीन वर्षांपासून एकत्र कुकिंगचं काम करत होते. याच दरम्यान दोघेही प्रेमात पडले आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले.
महिनाभरापूर्वी राजकुमार हा घरी आला आणि त्याने युवतीसोबतचे बोलणे बंद केले. यामुळे युवती प्रियकराचा शोध शोधण्यासाठी दुबईहून भारतात आली. काही दिवस लखनौच्या हरैया येथील हॉटेलमध्ये राहिली. तीन दिवस तिच्या धाकट्या बहिणीच्या घरी राहिली. यानंतर प्रियकर राजकुमारच्या घरी पोहोचली. प्रेयसी गावात आल्याचे समजताच प्रियकराच्या कुटुंबियांनी घराला कुलूप लावून पळ काढला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रेयसीने सांगितले की, ‘प्रियकराची उपाशी राहून वाट पाहत आहे. प्रशासनाकडे मदतीचे आवाहनही केले आहे. प्रियकर नक्कीच येईल आणि तिला आपल्यासोबत राहिल. प्रियकराच्या घराबाहेरच करवा चौथचा उपवासही केला आहे.’
प्रेयसीचा आत्मा दिसत असून, ती मला जगून देणार नाही…
विवाहित प्रेयसीला लॉजमध्ये घेऊन गेला अन् पुढे काही वेळातच…
प्रेयसीची गळा चिरून हत्या करणाऱ्या आरोपीचाही जंगलात शेवट…
महाराष्ट्र हादरला! प्रेयसीचे दुसरीकडे लग्न ठरल्यानंतर गळा चिरून केली हत्या…
दोन भावांचा एकाच महिलेवर जडले प्रेम अन् पुढे…
सैराटची पुनारवृत्ती! आर्ची-परशासारखेच दोघांना संपवलं…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!