
प्रेम! पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही म्हणून मारली नदीत उडी…
सांगली : युवकाने मोबाईलला स्टेटस ठेवून वारणा नदीत उडी घेतल्याची घटना घडली आहे. तुषार गणपती पांढरबळे (वय 24) याने प्रेम प्रकरणातून टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील वारणा नदीवरील मांगले आणि सावर्डे बंधाऱ्यावरून शनिवारी दुपारच्या सुमारास तुषार गणपती पांढरबळे याने पाण्यात उडी मारली आहे. तुषार हा मूळचा बिळाशीचा आहे. मात्र, तो मांगले येथे आपल्या आजोळी आईसह रहात आहे. खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. उडी मारण्यापूर्वी काही तास अगोदर त्याने मोबाईलच्या स्टेटसला ‘मला शोधण्याचा प्रयत्न करू नको, मी झोकून दिले.. कुठेही सापडणार नाही.. तुझ्याच आठवणीत जगत राहीन, पण पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही.. असा मजकूर ठेवला होता. त्यामुळे प्रेम प्रकरणातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, मासेमारी करणाऱ्यांनी तुषारला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तुषारने उडी मारल्यानंतर नदीच्या पाण्याच्या प्रवाहात तो दिसेनासा झाला. मांगल्याचे पोलिस पाटील संजय कांबळे यांनी घटनेची माहिती शिराळा पोलिस ठाण्यात दिली. यानंतर शिराळा पोलिस घटनास्थळी आले. मात्र, वारणा नदीचे पात्र मोठे विस्तीर्ण आहे. त्यामुळे तुषारला शोधणे अवघड झाले आहे. बंधाऱ्याच्या खाली पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे तो किती दूर गेला आहे, हे समजणे कठीण आहे. त्यामुळे आज सकाळी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सांगलीमध्ये सराईत गुंड सच्या टारझनचा निर्घृण खून; हल्लेखोर…
‘पिस्तुल्याभाई’ला पोलिसांनी शिकवला धडा; गुन्हा दाखल…
हृदयद्रावक! नवदाम्पत्य बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेले अन्…
लॉकडाऊनमधील प्रेमसंबंधाचा तिहेरी खुनाने झाला शेवट अन्…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…