प्रेयसीचा आत्मा दिसत असून, ती मला जगून देणार नाही…

लखनौ (उत्तर प्रदेश): प्रियकरासोबत करवाचौथ साजरा करण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. प्रियकर पूर्णपणे नशेच्या आहारी गेला होता. करवाचौथच्या रात्री त्याला प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते. मात्र तिने त्याला नकार दिला. रागाच्या भरात त्याने प्रेयसीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या भांडणामध्ये प्रेयसीचा मृत्यू झाला आहे.

प्रेयसीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने कट रचला. त्याने घरातच 3 फुटाचा खड्डा खोदला आणि त्यात मुलीचा मृतदेह दफन केला. 2020 साली ही घटना घडली होती. रुबी नावाच्या युवतीचा तिच्या पतीसोबत घटस्फोट झाला होता. ती तिच्या आई आणि दोन मुलांसह राहत होती. करवाचौथच्या रात्री तिने तिच्या आईला मित्राला भेटायला जात असल्याचे सांगितले होते. पण, रात्र उलटून गेली तरी रुबी घरी परतली नाही म्हणून त्यांनी तांत्रिक नावाच्या मित्राला फोन करुन चौकशी केली. यावेळी त्याने ती येथे आलीच नसल्याचे सांगितले. आठ दिवस उलटून गेल्यानंतरही रुबीचा काहीच तपास लागत नसल्याने तिच्या आईने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

पोलिसांनी रुबीचे कॉल डिटेल तपासले तेव्हा कळले की रुबीचा एक प्रियकर आहे. मात्र, त्यानेही रुबीबद्दल काहीच सांगण्यास नकार दिला. रुबी जिवंत आहे की तिचा मृत्यू झालाय याचा काहीच पुरावा पोलिसांकडे नव्हता. मात्र, अचानक एके दिवशी रुबीचा प्रियकर पोलिस ठाण्यात आला. त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्याने पोलिसांना सांगितले की, रुबीचा आत्मा दिसत असून, ती मला जगून देणार नाही, असे तो वारंवार सांगत होता. त्यानंतर त्याने पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगून टाकला. करवाचौथच्या रात्रीच रुबीची हत्या करून खोलीत तीन फुट खड्डा खणून तिचा मृतदेह दफन केल्याचे सांगितले.

पोलिसांनी आरोपीच्या खोलीत खोदकाम करताच तिथे एका मुलीचा सांगाडा सापडला. मुलीच्या हातात असलेल्या बांगड्यावरुन तिच्या आईने मृतदेहाची ओळख पटवली. आरोपीचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यानेच हत्येचा कबुलीजबाब दिला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

विवाहित प्रेयसीला लॉजमध्ये घेऊन गेला अन् पुढे काही वेळातच…

महाराष्ट्र हादरला! प्रेयसीचे दुसरीकडे लग्न ठरल्यानंतर गळा चिरून केली हत्या…

धक्कादायक! प्रियकर आणि प्रेयसीने चिरले एकमेकांचे गळे…

विद्यार्थ्याचे शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध अन् शिक्षिकेची दुसऱ्यासोबत…

भाचा आणि मामीचे प्रेमसंबंध; मामाने घेतला मोठ निर्णय…

महिला पोलिसाची प्रेमप्रकरणातून हत्या; नवऱ्याने सांगितले की…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!