
सायबर मर्डर! पुण्यातील उद्योगपतीचं पटना एअरपोर्टवरून अपहरण अन् हत्या…
पुणे : पुण्यातील उद्योगपतीची बिहारच्या पाटण्यात खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लक्ष्मण साधू शिंदे (वय 55) असे हत्या झालेल्या उद्योगपतीचे नाव आहे. कंपनीच्या कामासाठी ई-मेल करत पाटण्यात बोलावून घेत उद्योगपतीची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. कोथरूडमधील उद्योगपतीचा ‘सायबर मर्डर’ झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
लक्ष्मण साधू शिंदे हे कोथरूड परिसरातील उद्योगपती असून त्यांना कंपनीचे काही टूल्स आणि मशीनरी स्वस्त भावात विकत देतो, असा ई-मेल आरोपींकडून करण्यात आला होता. या ई-मेलद्वारे लक्ष्मण शिंदे यांना पाटण्यात बोलावून घेण्यात आले. त्याच मशिन स्वस्तात मशिनरी मिळेल यासाठी उद्योगपती बिहारला गेले होते. मात्र त्यांच्याशी संपर्क तुटल्याने अखेर कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबाकडून देण्यात आली होती. पाटण्यात काल त्यांचा मृतदेह सापडला आहे.
पोलिसांनी एका युवतीसह तीन जणांना ताब्यात घेतले आहे. स्क्रॅप डिलच्या बहाण्याने बोलवले त्यानंतर अपहरण करून खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पोलिसांनी एक काळी स्कॉर्पिओ, एक लॅपटॉप आणि चार महागडे मोबाईल फोन जप्त केले आहेत. शिंदे यांचे ११ एप्रिल रोजी संध्याकाळी त्यांच्या पत्नी रत्नप्रभा यांच्याशी शेवटचे बोलणे केले होते. त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. शिंदे यांचा खून करणारी टोळी सराईत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
शिंदे यांच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पाटणा आणि जहानाबाद पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू केला. शिंदे यांचे मेहुणे विशाल लवाजी लोखंडे यांनी पाटणा आणि पुण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांना संशय आहे की, शिंदे यांचे अपहरण करणारी टोळी नागरिकांचे अपहरण करायची आणि त्यांच्या खात्यातून पैसे काढून त्यांना सोडून द्यायची, परंतु या प्रकरणात त्यांनी खून केला. पोलिस आता शिंदे यांना का मारले हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
महाराष्ट्र पुन्हा हादरला! बिल्डरचे अपहरण अन् नग्र करून पट्ट्याने बेदम मारहाण…
शिरूर येथून अपहरण केलेल्या चिमुकलीची मुंबईतून सुखरूप सुटका…
पुणे पोलिसांनी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झालेबाबतचा खोटा बनाव केला उघड…
प्रेमविवाह करणाऱ्या युवकाचे सासऱ्याने केले अपहरण; सिनेस्टाईल सुटका…
राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरण प्रकरणात ट्विस्ट…

