दोन भावांचा एकाच महिलेवर जडले प्रेम अन् पुढे…

नागपूर : दोन चुलत भावांचे एक महिलेवर असलेल्या प्रेमामुळे एकाला जीव गमवावा लागला आहे. आरोपी राजेश चौहान उर्फ गब्बरच्या (वय ४७) लिव्ह इन पार्टनरने लग्न न करता त्याच्या मुलांना जन्म दिला होता; पण नंतर या महिलेचा (वय ३५) गब्बरच्या चुलत भावावर जीव जडला आणि खुनाची घटना घडली.

महिलेचा लिव्ह-इन-पार्टनर असलेल्या गब्बरने आपला चुलत भाऊ नितीन रोहनबाग (वय ४०) याच्या हत्येकरिता मदत करण्यासाठी दोन पुतण्यांना बोलावले. खुनाच्या अवघ्या 24 तास आधी एका सरकारी आरोग्य सुविधेचा परिचारक असलेल्या गब्बरविरोधात महिलेने मारहाणीची तक्रार दिली होती. नंतर पोलिसांनी त्याला ताकीद दिली होती; पण त्याआधीच त्याने महालमध्ये चित्रपटगृहात काम करणाऱ्या रोहनबागची हत्या केली.

पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर गब्बर 12 वर्षांपासून एका महिलेसोबत राहत होता. तिने अलीकडेच वेगळं होण्यासाठी कायदेशीर प्रकरण दाखल केले आहे. रोहनबाग हा आधीच दोन मुलांचा बाप होता आणि अलीकडेच तो गब्बरच्या लिव्ह-इन पार्टनरच्या प्रेमात पडला होता. रोहनबागला गब्बरची लिव्ह-इन पार्टनर आवडायची. त्यामुळे चुलत भावांमध्ये भांडण झाले आणि महिलेवरही गब्बरने राग काढला.

रोहनबाग व गब्बरच्या पार्टनरमध्ये जवळीक वाढली आणि रोहनबागने संसार थाटण्यासाठी गब्बरच्या घरी राहण्याची ऑफर दिली; पण गब्बरला रोहनबागवर संशय आला आणि यावरून अनेकदा त्यांचे भांडण झाले. दरम्यान, गब्बरने त्याच्या पहिल्या पत्नीलाही भेटायला सुरुवात केली होती. रोहनबागच्या पत्नीलाही पतीचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली आणि तिने महिलेशी संबंध तोडून घरी परतण्यासाठी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर गब्बरच्या लिव्ह इन पार्टनरने दोघांविरुद्ध बंड केल्यावर दोन्ही प्रेमीयुगलांच्या कुटुंबीयांनी एकत्र येऊन या प्रकरणावर चर्चा केली होती.

इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कमलाकर गड्डीमे म्हणाले, भांडणानंतर गब्बर व त्याची लिव्ह-इन पार्टनर आणि रोहनबाग यांचे अनेक तास काउन्सलिंग करण्यात आले. त्यानंतर आम्ही कारवाई सुरू केली; पण गब्बरने ऐकले नाही आणि कायदा स्वतःच्या हातात घेतला. पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर गब्बरची लिव्ह इन पार्टनर रोहनबागसोबत घरी गेली. मग तासाभरात गब्बरने पुतण्या अनिकेत झांझोटे आणि चुलत भाऊ रितेश झांझोटे यांना बोलावून हत्येचा कट रचला.

गब्बर त्यांना घेऊन घरी गेला आणि त्याला रोहनबागची दुचाकी बाहेर दिसली. गब्बरने दार ठोठावले आणि शेजारी असल्याचे नाटक केले. महिलेने दरवाजा उघडला आणि त्याने आत जाऊन रोहनबागला बेडवर पाडले. दोघांमध्ये हाणामारी झाली आणि गब्बरने त्याच्या साथीदारांच्या मदतीने रोहाबागला मारहाण केली आणि नंतर खंजीर काढून तो रक्ताच्या थारोळ्यात पडेपर्यंत त्याच्यावर वार केले. तोपर्यंत महिलेने तिथून पळ काढला आणि पोलीस स्टेशन गाठले. पोलीस घटनास्थळी आल्यावर त्यांना रोहनबागचा मृतदेह दिसला. गब्बरला अनिकेत आणि रितेशसह ताब्यात घेण्यात असून, पुढील तपास करत आहेत.

विद्यार्थ्याचे शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध अन् शिक्षिकेची दुसऱ्यासोबत…

भाचा आणि मामीचे प्रेमसंबंध; मामाने घेतला मोठ निर्णय…

चुलतीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती चुलत्याला समजली अन्…

व्याही आणि विहीणमध्ये जुळले प्रेमसंबंध; पळूनही गेले पण…

वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध; दिर बलात्कार अन् आत्महत्या…

पती-पत्नीने जोरदार भांडणानंतर एकमेकांना प्रेमाने मिठीत घेतले अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!