महाराष्ट्र हादरला! प्रेयसीचे दुसरीकडे लग्न ठरल्यानंतर गळा चिरून केली हत्या…
पालघर: मोखाड्यात येथे भरदिवसा विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अर्चना उदर असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अर्चना उदर ही बारावीत वर्गात शिकत होती. आश्रम शाळेतून महाविद्यालयात जात असताना तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मोखाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आश्रम शाळेतून महाविद्यालयात चालत जाणाऱ्या विद्यार्थीनीवर रस्त्यातच कोयत्याने वार करत गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना मोखाडा येथे घडली आहे. मोखाड्यातील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात बारावीत विज्ञान शाखेत शिकणाऱ्या अर्चना उदर या विद्यार्थिनीवर हा जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला आहे. अर्चना ही बारावीत शिक्षण घेत असून महाविद्यालय ते आश्रम शाळा अशा पाचशे मीटरचा रस्ता पायी जात असताना अर्चनावर हा हल्ला करण्यात आला.
अर्चना सोबत असलेल्या तिच्या मैत्रिणींनी आरडाओरड सुरू केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. मृत मुलीचे आरोपीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तिचे दुसऱ्या ठिकाणी लग्न जमले होते. यामधून तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. प्रभाकर वाघिरे असे आरोपीचे नाव असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
धक्कादायक! प्रियकर आणि प्रेयसीने चिरले एकमेकांचे गळे…
प्रेयसीचा गळा चिरणाऱ्या प्रियकराला पश्चिम बंगालमधून वेशांतर करून पकडले…
प्रेयसीला फ्लॅटवर शेवटचं भेटायला बोलावलं अन्…
प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेला प्रियकराला पकडले अन् विवस्त्र करून…
प्रियकर आणि प्रेयसी ओयो हॉटेलमध्ये अन् काही वेळानंतर…
प्रेमसंबंध तोडले, स्टॅम्पवर लिहून घेतलं तरी पहाटेच्या सुमारास…