प्रेयसीची गळा चिरून हत्या करणाऱ्या आरोपीचाही जंगलात शेवट…
पालघर : मोखाड्यात भरदिवसा विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर प्रियकराने मोखाडा येथील जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रभाकर वाघेरा असे आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
अर्चना उदर या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची विद्यालयात जात असताना रस्त्यात गळा चिरून हत्या झाल्याची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती. अर्चना हिची हत्या केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीनेही आत्महत्या केली आहे. मोखाडा येथील जंगलात गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे.
अर्चना उदर ही आश्रम शाळेतून महाविद्यालयात पायी चालत जात असताना आरोपीने विद्यार्थीनीवर रस्त्यातच कोयत्याने वार करत गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. ६) मोखाडा येथे घडली होती. अर्चना ही मोखाड्यातील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात बारावीत विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती.
अर्चना ही बारावीत शिक्षण घेत असून महाविद्यालय ते आश्रम शाळा अशा पाचशे मीटरचा रस्ता पायी जात असताना अर्चनावर हा हल्ला करण्यात आला होता. अर्चना सोबत असलेल्या तिच्या मैत्रिणींनी आरडाओरड सुरू केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता. मृत अर्चना हिचे आरोपीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तिचे दुसऱ्या ठिकाणी लग्न जमले होते. यातून तिची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर आता आरोपीनेही गळफास घेतला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
महाराष्ट्र हादरला! प्रेयसीचे दुसरीकडे लग्न ठरल्यानंतर गळा चिरून केली हत्या…
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्याची कोयत्याने वार करत हत्या…
डॉक्टरने केला तीन युवतींवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टवर गोंदवले नाव…
प्रेमसंबंध तोडले, स्टॅम्पवर लिहून घेतलं तरी पहाटेच्या सुमारास…
हिंजवडी पोलिस स्टेशन हद्दीतून बेपत्ता व्यक्तीचा खून अनैतिक संबंधातून…