मोक्का ८९! खडक पोलिस स्टेशन हद्दीतील टोळीवर मोक्का…

पुणे (संदीप कद्रे): खडक पोलिस स्टेशन हद्दीतील नवनाथ ऊर्फ नब्या सुरेश लोधा (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०३ साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ८९वी कारवाई आहे.

फिर्यादी हे ३०/१०/२०२३ रोजी रात्री त्यांचे राहते घरी झोपले असताना, त्यांचे घराच्या दरवाजा वाजवल्या मुळे फिर्यादी यांनी घराचा दरवाजा उघडला. दरवाज्या बाहेर उभा असलेल्या नवनाथ ऊर्फ नब्या याने फिर्यादीस ‘तेरा भाई किधर हैं’ असे विचारून, उसको बुला असे म्हणल्यामुळे फिर्यादी यांनी त्यांचा चुलत भाऊ अनिल यास बाहर कोई आपको बुला रहा हैं असे सांगितले. त्यावेळी फिर्यादी यांनी किचन मध्ये पाणी पिऊन दरवाज्याकडे पाहिले. त्यावेळी अनिल हा नवनाथ ऊर्फ नब्या याचेबरोबर बोलत असताना, त्याने अनिल यास काहीतरी विचारले असता, अनिल याने मान हालवून नकार दिला. त्याच वेळी नवनाथ ऊर्फ नब्या याने बंदुक काढून, फिर्यादीचा चुलत भाऊ अनिल याच्या कपाळावर लावून गोळी झाडून त्यास गंभीर जखमी करून त्यांचा खुन केला.

फिर्यादीचे राहते इमारती बाहेर थांबलेल्या त्याच्या साथीदारांसह दुचाकीवर बसून घाई गडबडीने निघून गेला. सदरबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन खडक पोलिस ठाणे गुन्हा रजि नं.३६९/२०२३, भा.द.वि. कलम ३०२, ३४, आर्म अॅक्ट कलम ३(२५), महाराष्ट्र पोलिस कायदा सन १९५१ चे कलम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान सदरचा गुन्हा हा आरोपी
१) नवनाथ ऊर्फ नब्या सुरेश लोधा वय ३७ वर्षे,रा.श्रीकृष्ण हाईटस ५१२, घोरपडे पेठ पुणे (टोळी प्रमुख)
२) गणेश उल्हासराव शिंदे, वय ४१ वर्षे,रा.चव्हाणनगर,धनकवडी पुणे
३) रोहीत संपत कोमकर, वय ३३ वर्षे, रा. ७१५ गुरूवार पेठ, पुणे
४) अमन दिपक परदेशी, वय २९ वर्षे, रा. ४१, घोरपडे पेठ, पुणे (टोळी सदस्य) यांनी केला असुन सदर गुन्हयात त्यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपी नवनाथ ऊर्फ नब्या सुरेश लोधा (टोळी प्रमुख) यांचे पुर्व रेकॉर्डची पाहणी करता, त्याने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करून, टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्यासाठी व अवैद्य मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी जबरी चोरी किंवा दरोडा टाकणे धमकी देणे किंवा धाकदपटशा दाखवून जबरदस्ती करून आपली बेकायदेशीर कृत्ये चालु ठेवुन, त्याने व त्याचे इतर साथीदारांनी खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, दुखापत करणे, घातक शस्त्र जवळ बाळगणे अशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यांचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांचे गुन्हेगारी वर्तना मध्ये सुधारणा होत नसल्याचे दिसुन येत असून, त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केले आहेत. दाखल गुन्हयाचे तपासामध्ये आरोपींनी संघटीतरित्या सदर गुन्हा केल्याचे निदर्शनास आल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१)(ii).३(२).३(४) प्रमाणे अंतर्भाव करण्यासाठी खडक पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल माने यांनी पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-०१, पुणे शहर, संदीपसिंह गिल यांचे मार्फतीने अपर पोलिस आयुक्त, पश्चिम विभाग, पुणे शहर, प्रविणकुमार पाटील यांना प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रकरणाची छाननी करून खडक पोलिस ठाणे गुन्हा रजि नं.३६९/२०२३, भा.द.वि.कलम ३०२, ३४, आर्म अॅक्ट कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलिस कायदा सन १९५१ चे कलम ३७ (१) सह १३५ या गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१)(ii),३(२),३(४) प्रमाणेचा अंतर्भाव करण्याची मा.अपर पोलिस आयुक्त, पश्चिम विभाग, पुणे शहर, प्रविणकुमार पाटील यांनी मान्यता दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलिस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर, अशोक धुमाळ हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम विभाग,पुणे, प्रविणकुमार पाटील, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-०१,पुणे, संदीपसिंह गिल, सहा. पोलिस आयुक्त,फरासखाना विभाग, पुणे, अशोक धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल माने, पोलिस निरीक्षक (गुन्हे), संपतराव राऊत, सहा. पोलिस निरीक्षक, राकेश जाधव, पोलिस उप-निरीक्षक,अतुल बनकर, पोलिस अंमलदार, महेश पवार, नितीन जाधव, स्वप्नील बांदल यांनी केली
आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन, शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मकोका अंतर्गत केलेली ही ८९वी कारवाई आहे.

मोक्का ८७! कसबा पेठेत दहशत पसरणाऱ्या थोरात टोळीवर मोक्का…

मोक्का ८६! ‘आम्ही भाई लोक आहोत’ असे बोलून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची धोत्रे टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८३वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८०वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७८वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत ७७वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मकोका अंतर्गत ७४वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७१ वी कारवाई; पाहा आरोपींची नावे…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…

ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…

डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…

पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…

पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!