
भारतातील युवतीचे पाकिस्तानी युवकासोबत ऑनलाइन लग्न; पुन्हा भारतात परतली अन्…
मुंबई : ठाण्यातील एका युवतीची सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील युवकासोबत ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर तिने पाकिस्तान गाठले आणि युवकासोबत लग्न केले. १७ जुलै रोजी ती परत भारतात आली असून, ठाणे पोलीस तिची चौकशी करत आहेत.
ठाण्यातील एका युवतीने ठाणे ते पाकिस्तान प्रवास करत पाकिस्तानातील एबोटाबाद येथे जावून लग्न केले. पाकिस्तान रावलपिंडी येथे काही महिने ही युवती राहिली आणि 17 जुलैला पुन्हा भारतात परत आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
सनम या युवतीचे २०१२ मध्ये झाले होतं. माझा पती काहीच करायचा नाही, माझी आई मला पैसे पाठवायची, मी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आईसोबत राहिले, पती न्यायला आला नाही. त्यानंतर नातं संपवलं आणि २०१५ मध्ये नाव बदलल्याचे युवतीने सांगितले. सनम म्हणाली की, ‘मी नाव २०१५ मध्ये बदलले होते. पाकिस्तानमध्ये लग्न करण्याचा काही उद्देश नव्हता. २०२१ मध्ये मी युवकाच्या संपर्कात आले, महिन्याभरात आमची मैत्री झाली. एक दीड वर्षाने लग्नाचा निर्णय घेतला आणि कुटुंबियांशी बोललो. सगळं बोलणं मोबाईलवरून झालं, चॅटिंग, कॉलवर चर्चा झाली. दोन्ही कुटुंबांनी व्हिडीओ कॉलवर चर्चा केली. २०२३ मध्ये पासपोर्ट तयार केला. मी फक्त नाव बदलले, फोटो आणि जन्मतारीख तीच आहे. आधारकार्डही मी २०१५मध्ये अपडेट केले होते. मी २४ फेब्रुवारी २०२४ ला ऑनलाइन लग्न केले. निकाह पाकिस्तानमध्येही रजिस्टर केला. पूर्ण वैधरित्या नोंदणी करून मी पासपोर्ट घेतला.
सनम म्हणाली, ‘मी अमृतसरला गेले, तिथून सीमेच्या पलिकडे गेले. पहिल्या गेटवर पासपोर्टची एन्ट्री झाली. तिथून पुढे गेल्यानंतर सगळी चौकशी केली जाते, सगळं ठीक असेल तर पुढे पाठवतात. पासपोर्ट आणि एन्ट्री झाल्यानंतर बसने बॉर्डर क्रॉस केली. ऑनलाइन लग्न केल्यामुले तिथे जाऊन फक्त रिसेप्शन झाले. कुटुंबियांचे पासपोर्ट नसल्याने ते येऊ शकले नाही. भारतात १७ जुलैला आले आणि २१ जुलैला मुंबईत पोहोचले. दोन दिवस दिल्लीत होते.’
पोलिसकाका Video News: २४ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू भारतात परतली; मुलांना भेटणार अन्…
Video: पाकिस्तानी सीमा हैदरला ‘बिग बॉस 17’ ची ऑफर
प्रेम! पाकिस्तानात गेलेली अंजू लागली रडू म्हणतेय भारतात जायचे…
Video: पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिचा नवीन व्हिडिओ समोर…
पाकिस्तानात पळून जाण्याच्या तयारीत असलेली प्रेयसी पोलिसांच्या ताब्यात…
परदेशी प्रेम! भारतीय वकीलाचे पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाईन लग्न…
प्रेम! भारतीय महिलेने प्रियकराला भेटण्यासाठी गाठले पाकिस्तान…