भाचा आणि मामीचे प्रेमसंबंध; मामाने घेतला मोठ निर्णय…
लखनौ (उत्तर प्रदेश) : भाचा आणि मामीचे प्रेमसंबंध होते. याबाबतची माहिती मामाला समजल्यानंतर त्याने तीन मुलांसह स्वतः कीटकनाशक प्राशन केले. या घटनेत मामाचा मृत्यू झाला, तर तीन मुलांवर बहराइच जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहराइच जिल्ह्याच्या निजामपूर गावात ही घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
राणीपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निजामपूर गावात राहणारा धर्मराज (वय ४०) हा जम्मू-काश्मीरमध्ये मजूर म्हणून काम करायचा. त्याची पत्नी ममता, मुलगा हृतिक (12), मुलगी छाया (8) आणि मुस्कान (4) हे गावी घरी राहत होते. धर्मराज कामानिमित्त बाहेरगावी राहात असल्याने त्याची पत्नी ममता हिचे तिच्या भाच्याशी प्रेमसंबंध सुरू झाले. ममता 15 दिवसांपूर्वी भाच्याबरोबर मुलांसह मुंबईला गेली होती. हा प्रकार पती धर्मराजला समजताच तो गावी आला. पत्नी आणि मुलांना परत आणण्यासाठी तो मुंबईलाही गेला होता; मात्र ममताने सोबत येण्यास नकार दिला. यानंतर तो तिन्ही मुलांना घेऊन घरी परतला.
पत्नीने केलेल्या विश्वासघातामुळे धर्मराज तणावाखाली होता. रविवारी (ता. 29) संध्याकाळी सात वाजता धर्मराज याने बिस्किटांमध्ये कीटकनाशक मिसळले. त्याने ती बिस्किटे आपल्या तीन मुलांना खाऊ घातली आणि नंतर स्वतः खाल्ली. संपूर्ण कुटुंबाची प्रकृती बिघडल्याने आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी चौघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखलकेले. धर्मराजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर मुलांवर उपचार सुरू आहेत.
निजामपूर गावातील नागरिकांनी सांगितले, रविवारी संध्याकाळी धर्मराजच्या मुलांनी आईकडे जाण्याचा हट्ट धरला होता. याला कंटाळून धर्मराज याने स्वत: कीटकनाशकमिश्रित बिस्किटं खाऊन मुलांनाही ती खाऊ घातली. सध्या या तिन्ही मुलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलगा हृतिक आणि मोठी मुलगी छाया यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
महिला पोलिसाची प्रेमप्रकरणातून हत्या; नवऱ्याने सांगितले की…
चुलतीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती चुलत्याला समजली अन्…
पुणे जिल्ह्यात अनैतिक प्रेमसंबंधास विरोध केल्याने पतीचा खून…
प्रेमविवाहानंतर नवऱ्यासह पाच जणांचा काढला काटा; गूढ उकलले…
वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध; दिर बलात्कार अन् आत्महत्या…