भीषण दुर्घटना! नेपाळमध्ये विमान कोसळून 19 जणांचा मृत्यू…

काठमांडू (नेपाळ): काठमांडू येथे विमानाला आज (बुधवार) सकाळी अकराच्या सुमारास अपघात झाला असून, १९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. काठमांडूहून पोखराला जाणारे विमान कोसळले आहे.

सौर्या एअरलाइन्सच्या विमानाने त्रिभुवन विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते अनिंयंत्रित झाले आणि सकाळी अकराच्या सुमारास कोसळले. विमान कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात आग लागली. धुराचे लोट हवेत पसरले होते. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून, बचावकार्य सुरू आहे. मात्र, विमानातील सर्वच्या सर्व १९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विमान कोसळल्यानंतर त्याने पेट घेतला.

विमानाने त्रिभुवन विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर टेक ऑफ करत असताना विमान अनियंत्रित झाले. विमान जमिनीवर कोसळल्यानंतर भीषण आग लागली. आग आटोक्यात आणण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टेक-ऑफ दरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले, त्यामुळे हा अपघात झाला. हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते आणि त्यात एकूण 19 प्रवासी होते. अपघातानंतर विमानाला आग लागली आणि आकाशात धुराचे प्रचंड ढग पसरले. अपघातामुळे विमानाला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दल आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची टीम तैनात करण्यात आली आहे.

अपघाताची माहिती मिळताच सरकारने मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराचे जवान घटनास्थळी पाठवले. वैद्यकीय आणि लष्कराचे पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. पायलटला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे पीटीआयने वृत्त दिले आहे. वैमानिकाच्या प्रकृतीबाबत अधिक तपशील मिळालेला नाही. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बचावकार्य करतानाचे फोटो समोर आले आहे. विमानाचा अपघात झाल्यानंतर आगीचे लोट आणि मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते.

पोलिसकाका Video News: २४ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

मोठी दुर्घटना! नेपाळमध्ये प्रवाशांनी भरलेल्या दोन बस नदीत कोसळल्या…

नेपाळमधील विनाशकारी भूकंपात अनेकांचा बळी…

नेपाळमध्ये भीषण अपघात 6 भारतीय भाविकांसह 7 जणांचा मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!