अभिनेत्रीवर बलात्कार आणि मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक…
मुंबईः एका अभिनेत्रीने टांझानियाचा रहिवासी असलेल्या विरेन पटेल याच्यावर बलात्कार आणि जबर मारहाण केल्या प्रकरणी एन.एम जोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
आरोपी विरेन आणि अभिनेत्रीची वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. दोघे एकत्र राहात होते. विरेनने या अभिनेत्रीला लग्नाचे आमिश दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. लग्नासंबंधित विचारताच तो या अभिनेत्रीला मारहाण करीत असे. अखेर याला कंटाळून या अभिनेत्रीने एन एम जोशी मार्ग पोलिस ठाण्यात विरेन विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एकदा दिवशी विरेन नषा करुन आला आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. एकदा तो तिला घेऊन मित्राच्या फार्म हाउसवर गेला. त्यावेळीही त्याने तिच्यासोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनेकदा अभिनेत्रीच्या इच्छेविरुद्ध आरोपीने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, असे अभिनेत्रीने तक्रारीत म्हटले आहे.
भारतीय दंड संहितेच्या कलम 376, कलम 323, कलम 504 नुसार विरेन पटेलवर गुन्हा दाखल केला आहे. लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार आणि मारहाण केल्याप्रकरणी आता आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
हनी ट्रॅपप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक…
धक्कादायक शेवट! रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड…