शारिरीक संबंधावरून मैत्रिणीच्या विवाहीत प्रियकराचे कापले गुप्तांग…

कानपूर (उत्तर प्रदेश): आपल्यासोबत प्रेमसंबंध ठेवायला नकार दिल्याने एका युवतीने आपल्या मैत्रिणीच्या प्रियकराचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित युवकाचे तिच्या मैत्रिणीशी विवाहबाह्य प्रेमप्रकरण सुरू होते.

कानपूरच्या ग्रामीण भागातील चौबेपूर येथे ही घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित युवकाचे आरोपी युवतीच्या मैत्रिणीशी विवाहबाह्य संबंध होते. या संबंधांमध्ये मैत्रीण हस्तक्षेप करू लागली होती. प्रियकर रविवारी रात्री आपल्या प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेला होता. तिने तिच्या मैत्रिणीला म्हणजेच आरोपी युवतीला तिथे बोलवून घेतले.

प्रेयसीची मैत्रीणही तिथे आलेली पाहून प्रियकर गोंधळला. आपल्या मैत्रिणीसोबतही त्याने संबंध ठेवावेत असे प्रेयसी त्याला सांगू लागली. पण, त्याने त्याला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या प्रेयसीच्या मैत्रिणीने दाताने त्याच्या गुप्तांगाला चावा घेत गुप्तांग कापले. प्रियकर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रक्तबंबाळ अवस्थेत घरी पोहोचला. त्याची अवस्था पाहून पत्नीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांना हा प्रकार कळल्यानंतर ते सुद्धा अवाक झाले. पोलिसांनी युवकाला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर त्याला कानपूर येथील मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी युवतीवर तक्रार दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

धक्कादायक! दारू पार्टीदरम्यान मित्राचे गुप्तांग कापले अन् पुढे…

सूनेचे सासऱ्याशी होते अनैतिक संबंध अन् एक दिवस…

क्रूरता! घोडींचे गुप्तांग शिवले तांब्याच्या तारेने…

संतापजनक! दिल्लीत 85 वर्षीय महिलेवर बलात्कार; ओठ कापले अन्…

मित्राने धमकी देत लहानपणीच्या मैत्रीणीवर केला बलात्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!