PUBG खेळताना संतुलन बिघडले अन् केली माता-पित्याची हत्या…

लखनौ (उत्तर प्रदेश) : एका युवक PUBG खेळत असताना त्याचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्याने आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना झाशी येथे घडली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपीला अटक केली आहे.

दूधवाला सकाळी घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. दुधवाल्याने घरात डोकावून पाहिले असता घरमालक आणि त्याची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसल्यानंतर त्याला धक्काच बसला. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले आहेत. मुलाने हत्येची कबुली दिली आहे. लक्ष्मी प्रसाद आणि विमला अशी मृतांची नावे आहेत. अंकित (वय २८) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

पोलिस जेव्हा घरी पोहोचले तेव्हा लक्ष्मी प्रसाद आणि विमला दोघेही गंभीर जखमी झाले होते. शिक्षक असलेले लक्ष्मी प्रसाद यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला आणि उपचारादरम्यान विमला यांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी अंकितला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. तपासात अंकित हा गेममुळे मानसिक रोगी झाला असल्याचे समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुलगा स्वप्नात येऊन विचारायचा; आई तू मला का मारले? अन् पुढे…

युवतीने कमी उंचीमुळे घेतला जगाचा निरोप…

माता न तू वैरिणी! आईने चिमुकलीच्या नाकाला चिमटा लावला अन्…

दिशा भोईटे हिच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन; चौकशीची मागणी…

मुंबईत एअर होस्टेस गळा चिरून हत्या; एकाला अटक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!