युवतीने कमी उंचीमुळे घेतला जगाचा निरोप…

औरंगाबाद : एका युवतीने कमी उंची असल्याच्या तणावातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. 4) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आला आहे. अर्चना विजयकुमार यादव (वय 23) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यादव (मूळ रा. उत्तर प्रदेश) कुटुंब 20 वर्षांपासून औरंगाबाद शहरातील साताऱ्यात वास्तव्यास आहेत. अर्चनाचे वडील विजयकुमार यांचा फरशीचा व्यवसाय असून आई गृहिणी आहे. सोमवारी अर्चना आईसोबत घरीच होती. रात्री आठ वाजता अर्चना खोलीत गेली. आईने साडेआठ वाजण्याच्या सुमारास हाका मारल्याय पण, खोलीतून प्रतिसाद येत नसल्याने आईने खोलीकडे धाव घेतली. तेव्हा अर्चना गळाफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिस अंमलदार विष्णू जगदाळे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्चनाचा मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवला.

दरम्यान, अर्चना आपल्या आई-वडिलांसह सातारा परिसरात राहत होती. तिला एक विवाहीत बहीण आणि दोन भाऊ आहेत. अर्चनाने कमी उंचीमुळे हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला. आपली उंची कमी असल्याने अर्चना नेहमी तणावात असायची अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णू जगदाळे तपास करत आहेत.

इंटरशिप करत असलेल्या डॉक्टरने घेतला जगाचा निरोप…

मी मेल्यावर तू रडशील का? असे स्टेटस ठेवून घेतला जगाचा निरोप…

युवकांच्या त्रासाला कंटाळून मुलीने घेतला जगाचा निरोप; चिठ्ठीत म्हटले की…

डॉ. आदिनाथ पाटीलने स्वतःला इंजेक्शन घेऊन घेतला जगाचा निरोप…

माता न तू वैरिणी! आईने चिमुकलीच्या नाकाला चिमटा लावला अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!